म्युच्युअल फंडावर उद्या कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंडविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (ता. ६) करण्यात आले आहे. ही कार्यशाळा अभिनव प्रशालेतीन सभागृहात सायंकाळी सहा वाजता घेण्यात येईल. 

पुणे - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंडविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (ता. ६) करण्यात आले आहे. ही कार्यशाळा अभिनव प्रशालेतीन सभागृहात सायंकाळी सहा वाजता घेण्यात येईल. 

आपल्याला मिळालेल्या पैशांचे व्यवस्थापन करून तो कसा वाढविता येईल, हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण आता पारंपरिक वाटांऐवजी नव्या गुंतवणूक पर्यायाचा शोध घेताना दिसत आहेत. भरघोस परतावा मिळवून देणारा व सुरक्षित असा गुंतवणूक प्रकार म्हणून सध्या म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. ही बाब लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’ने वाचकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

म्युच्युअल फंड म्हणजे समान आर्थिक उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी एकत्र येऊन उभी केलेली रक्कम, जी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतविली जाते; परंतु म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत अधिक परतावा मिळवून देणारी; तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा अधिक सुरक्षित, स्थिर आणि सुटसुटीत मानली जाते; या गुंतवणुकीची नेमकी प्रक्रिया त्याचे नेमके फायदे-तोटे याबाबत म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन घेण्याची संधी सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होणार आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी आणि दक्षता हा विषय सोप्या शब्दांत समजून घेण्याची संधी या व्याख्यानातून मिळेल आणि लोकांना वैयक्तिक पातळीवर तज्ज्ञांशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध होईल. हे संवाद साधतील. म्युच्युअल फंडात नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्व वयोगटांतील नागरिकांना ही कार्यशाळा उपयोगी ठरणारी असेल. हा कार्यक्रम प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर सर्वांसाठी विनामूल्य आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५८४६८३८