निकालाची उत्कंठा... पण विजय मात्र 'ती'चाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

पुणे- इथे मतमोजणी होती.. एकेका मताची बेरीज होत होती... निकालाची उत्कंठा होती... परंतु विजय मात्र आधीच ठरलेला होता.. तो होता केवळ आणि केवळ "स्त्रीशक्ती‘चा.. त्यामुळे सर्वाधिक मते मिळविलेल्या एकाजणीने नेतृत्त्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती... आणि "तिला‘ तेवढीच खंबीर साथ होती ती तिच्यासोबतच निवडणूक लढविलेल्या तिच्या स्पर्धक मैत्रिणींची.. 

पुणे- इथे मतमोजणी होती.. एकेका मताची बेरीज होत होती... निकालाची उत्कंठा होती... परंतु विजय मात्र आधीच ठरलेला होता.. तो होता केवळ आणि केवळ "स्त्रीशक्ती‘चा.. त्यामुळे सर्वाधिक मते मिळविलेल्या एकाजणीने नेतृत्त्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती... आणि "तिला‘ तेवढीच खंबीर साथ होती ती तिच्यासोबतच निवडणूक लढविलेल्या तिच्या स्पर्धक मैत्रिणींची.. 

कोणतीही निवडणूक म्हटले की जय-पराजय हा आलाच. परंतु सकाळनगर येथील "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर‘च्या आवारात सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये या जय-पराजयाचा लवलेशही कोठे दिसत नव्हता. उलट निवडणूक संपली.. आता सर्व जणींनी मिळून समाजात विधायक कामांचा डोंगर उभा करावयाचा निर्धार दिसत होता. निमित्त होते, "सकाळ‘च्या "तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना‘च्यावतीने "नेतृत्त्व विकास कार्यक्रमा‘अंतर्गत शहर व जिल्ह्यात तनिष्कांच्या घेतलेल्या निवडणुकीतील मतमोजणीचे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतपत्रिकेवर शिक्का मारणे आणि मोबाईल फोनवरून "मिस्ड्‌‘ कॉलच्या माध्यमातून "ऑनलाईन‘ मत नोंदविणे अशा दोन्ही प्रकारे केवळ महिलांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या अटीतटीने झालेल्या या निवडणुकीची मंगळवारी सकाळनगर येथे मतमोजणी झाली. मतमोजणीची निर्धारीत वेळ सकाळी साडेदहा असली तरी नऊ वाजल्यापासून तनिष्का उमेदवारांची पावले मतमोजणी केंद्राकडे पडत होती. मतमोजणीत काय होणार याची कमालीची उत्कंठा प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दिसत होती. मतमोजणी केंद्राच्या आवारात एकमेकींशी चर्चा करताना मतपेटीतून किती मते मिळतील आणि मिस्ड्‌ कॉलच्या माध्यमातून किती मतांची पोतडी फुटेल याचे आडाखे सर्वजणीच बांधत होत्या. 

 
सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मतोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक मतदारसंघाच्या टेबलवर "तीन...एक.. दोन...‘ असा मतपत्रिकेवरील क्रमांकाप्रमाणे आवाज घुमत होता. सर्व उमेदवारांचे लक्ष केवळ बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मतपत्रिकेवर होते. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी सुमारे तासाभरात संपली. त्यामध्ये मिस्ड्‌ कॉलच्या माध्यमातून मिळालेली ऑनलाईन मते मिळवून एकूण मतांच्या आधारे सर्वाधिक मते मिळविलेल्या तनिष्काला विजयी घोषित करताच मतमोजणीच्या प्रत्येक टेबलपुढे एकच जल्लोष झाला.. निवडणूक लढविणाऱ्या तरी कोण होत्या? दोन मैत्रिणी, नणंद-भाऊजयी, शेजारी-शेजारी निवडणुकीपुरत्या एकमेकींपुढे उभ्या ठाकल्या होत्या. परंतु एकीने स्पर्धा जिंकल्याच्या आनंदातील भागीदार मात्र सर्वचजणी होत्या.. म्हणूनच एक सर्वाधिक मते मिळविलेल्या तनिष्काचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे या तिच्या "स्पर्धक‘ उमेदवारच असल्याचे दुर्मिळ आणि सुखद चित्र मतमोजणी केंद्रात दिसत होते. विजयी तनिष्काचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. निवडून आलेल्या तनिष्काविषयी इतरांमध्ये ना द्‌वेश ना इर्षेची भावना होती. आता निवडणूक संपल्याने सर्वजनींनी मिळूनच जोमाने विधायक काम करावयाचे अशी वज्रमूठ बांधत होत्या. त्यानंतर "सेल्फी..‘ आणि "ग्रुप फोटोसेशन‘चा अंक बराच वेळ रंगला होता. 
मतमोजणीनंतर पुणे विभागाचे अतिरीक्त विभागीय आयुक्त शाम देशपांडे, पोलिस सह आयुक्त सुनील रामानंद आणि संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार आणि "सकाळ‘चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते विजयी तनिष्कांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांसोबत छायाचित्र काढण्यासाठी तनिष्कांची झुंबड उडाली होती. निवडणुकीतील सहभागी झालेल्या सर्वच तनिष्कांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. 

दरम्यान, मतमोजणीस प्रारंभ होण्यापूर्वी ‘सकाळ‘चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांनी निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रियेची माहिती दिली. महिलांना आत्मभान मिळाले पाहिजे आणि त्यांच्या आवाजाला अवकाश निर्माण करून देऊन नेतृत्त्व गुण विकसित करण्यासाठी "सकाळ‘ने ही निवडणूक प्रक्रिया राबविल्याचे अरणकल्ले यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ""आताच्या निवडणुका या नेतृत्त्वविकासाची नांदी आहे. सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत. राज्यात जबाबदारीने काम केल्यामुळेच तब्बल 550 कोटी लीटर पाणी साठविण्याचा पराक्रम तनिष्का करू शकल्या.‘‘ 
तनिष्का चळवळीला डावलून राज्यात राजकारण करणे शक्‍य होणार नाही, हे या निवडणुकीने दाखवून दिल्याचे नंदकुमार सुतार यांनी सांगितले. निवडणुका ही केवळ सुरवात आहे. यापुढे मोठी कामे करावयाची असून त्यामध्ये "सकाळ‘ हा तुमच्यामागे खंबीरपणे उभा राहिल याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्यावतीने शहरात वीस मतदान केंद्रांवर तर जिल्ह्यात दौंड, इंदापूर, शिरूर (टाकळी हाजी), आंबेगाव आणि जुन्नर या पाच तालुक्‍यातील बारा मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले. त्यासाठी शहरात 71 आणि जिल्ह्यात 28 तनिष्कांनी मतपेटीच्या माध्यमातून आपले नेतृत्त्वाला झळाळी दिली.

नणंद भाऊजयीमध्ये खेळीमेळीचा सामना 
हडपसर-ससाणेनगर मतदारसंघात आरती चव्हाण आणि दिपाली कवडे या दोघी नणंद-भावजयी निवडणुकीच्या आघाड्यात उतरल्या होत्या. परंतु खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक मते आरती चव्हाण या भाऊजयीने मिळविली. दोघींच्या मतामध्ये अवघ्या एका मताचा फरक आहे. परंतु विशेष म्हणजे या लढतीत सर्वाधिक मते मिळविल्याचा नणंदेलाच अधिक आनंद झाल्या