वाहतूक कोंडीवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

अनिल सावळे
सोमवार, 3 एप्रिल 2017

पुणे - स्थळ : वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांचा कक्ष... शनिवार, वेळ दुपारी तीन वाजून आठ मिनिटे... सीसीटीव्हीवर रेल्वे स्टेशन ते अलंकार चौकापर्यंत कोंडी झाल्याचे दृश्‍य... डॉ. मुंढे वॉकीटॉकीने नियंत्रण कक्षात फोन करतात. ‘पीटर टू कंट्रोल...स्टेशन रोड जाम आहे, तो क्‍लिअर करा...’ नियंत्रण कक्षातून बंडगार्डन पोलिसांना कॉल जातो...‘पीटर बंडगार्डन, स्टेशन रोड जाम आहे, कर्मचारी आहेत का ?... मार्शल पाठवा...’ त्यानंतर पथक बंडगार्डनला पोचते... काही मिनिटांत कोंडी दूर होते...

वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातूनही अशाच प्रकारे कोंडी दूर करण्यासाठी आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवली जात आहे.  शहरात दररोज काही प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. कधी वाहतूक पोलिस जागेवर नसतील तर एखादा वाहनचालक आपली गाडी बाजूला लावून वाहतूक नियंत्रित करीत असल्याचे दृश्‍यही पाहायला मिळते. ही दररोजची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चौका-चौकांमध्ये प्रत्यक्ष हजर असणाऱ्या वाहतूक पोलिसांसोबतच आता वाहतूक शाखेकडून सीसीटीव्हीचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. 

वाहतूक कोंडी होणारे प्रमुख चौक 
पुणे विद्यापीठ, जेधे चौक, नळस्टॉप, मजूर अड्डा चौक ते बेलबाग चौक, शाहीर अमर शेख चौक, आरटीओ चौक, अलका टॉकीज चौक, खंडुजीबाबा चौक, मालधक्‍का चौक, कात्रज चौक, खडी मशिन चौक, खराडी बायपास, बोपोडी, केशवनगर चौक, गोल्फ चौक, नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौक, भैरोबा नाला चौक यासह सुमारे २५ चौकांचा समावेश.

उपाययोजना 
 प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात 
 सीसीटीव्ही कक्षातून वाहतूक कोंडीवर नजर
 नियंत्रण कक्षात सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत १६ कर्मचारी कार्यरत
 रस्त्यांचे रुंदीकरण, चौक सुधारणा आणि सिग्नलचे सुसूत्रीकरण 

रुग्णवाहिकेसाठी रस्ता
हृदय अथवा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या वेळी ‘ग्रीन कॉरिडॉर’चे आयोजन केले जाते. यासाठी रुग्णवाहिकांना रस्ता खुला करून देण्यासाठी नियंत्रण कक्षातून संबंधित चौकांतील पोलिसांना सूचना दिल्या जातात. 

सीसीटीव्हीच्या मदतीने वाहतुकीच्या स्थितीचा आढावा घेतला जातो. वाहतूक पोलिस कर्तव्य बजावत आहेत का, हे तपासले जाते. वाहतूक नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा अंदाज घेता येतो. सकाळी-सायंकाळी ‘पिक अवर्स’मध्ये वाहतुकीची वर्दळ, महापालिकेकडून सुरू असलेली विकासकामे आणि वाहनांच्या ब्रेक डाऊनमुळे वाहतूक कोंडी होते. अशा वेळी अतिरिक्‍त मनुष्यबळ पाठवून, वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून वाहतूक सुरळीत केली जाते. 
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक 

Web Title: Traffic jam on CCTV Watch