वाहतूक कोंडी नित्याचीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

निगडी - येथील टिळक चौक हा पार्किंगचा स्पॉट बनला आहे. पदपथ हे विक्रेत्यांनी व्यापले असून रिक्षाचालकांची अरेरावी, वाहतूक पोलिसांची उदासीनता...ही सर्व या वाहतूक कोंडीची कारणे आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत सारे काही राजरोस सुरू आहे.

मधुकर पवळे पुलाखाली ऐसपैस टिळक चौक आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी हा चौक चालक आणि पादचाऱ्यांसाठी अडथळ्यांची शर्यत बनलाय. ज्येष्ठ आणि छोट्या मुलांना दररोज जीव मुठीत घेऊन हा चौक ओलांडावा लागतो. बेशिस्त रिक्षाचालक, पदपथावरील विक्रेते, चौकात वाहन पार्किंग करणारे चालक आणि याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे पोलिस आणि अतिक्रमणाविरोधी कारवाई करणारे पथक. राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्ताने सोकावलेले सारे या चौकाच्या श्वास कोंडण्याला कारणीभूत आहेत.

आयुक्‍तांचा अतिक्रमण व पथरीवाल्यांसाठी असणारा लिखित आदेश फलकावर भर चौकात झळकत आहे; पण आयुक्तांचा आदेश झुगारला जात आहे. बेकायदा पार्किंग बेशिस्तीकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे किंवा बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, टिळक चौक मोकळा श्वास तेव्हाच घेईल ज्या वेळी ‘पारदर्शक’ कारभाराला सुरवात होईल, अशी उपरोधिक कोपरखळ्याही काही ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रियेवेळी मारल्या.

अनिकेत देवकर (व्यावसायिक) : नियम मोडणारेच शहराची वाट लावत आहेत. गैरसोयी दूर करायला प्रशासन कोणत्या मुहूर्ताची वाटप पाहत आहे. आयुक्‍तांनी दोषींवर कठोर कारवाई करावी.

अनिकेत देवकर (व्यावसायिक) : नियम मोडणारेच शहराची वाट लावत आहेत. गैरसोयी दूर करायला प्रशासन कोणत्या मुहूर्ताची वाटप पाहत आहे. आयुक्‍तांनी दोषींवर कठोर कारवाई करावी.

प्रवीण दिवटे (लघुद्योजक) : कडक नियमांमुळे सर्व वठणीवर येतील. पालिकेचे अधिकारी आणि पोलिस यांनीच नियमांकडे आणि त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. असेच होत राहिले तर मोठे रस्ते असूनही पिंपरी चिंचवडचे पुणे व्हायला वेळ लागणार नाही. आयुक्तांनी आता तुकाराम मुंढेसारखे काम करावे.

Web Title: Traffic jams issue