पुण्यात अजूनही अनेक मंडळे रस्त्यावरच; वाहतूक कोंडी कायम

DJ
DJ

पुणे : पुणे शहरात रविवारी सकाळी सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेली अनेक मंडळे आजही (सोमवार) रस्त्यावरच असल्याने शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे. शहरातील प्रमुख रस्ते बंद आहेत.

रविवारी सकाळी साडेदहा वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली होती. पोलिसांनी वर्तुळाकार वाहतुकीचे नियोजन केले होते. अद्यापही अशीच वाहतूक सुरु असून, अनेक रस्ते बंद आहेत. शहरातील प्रमुख लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता अद्याप बंद आहेत. तर, स्वारगेट भागातही गणपती मंडळांची गर्दी आहे. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात अद्याप मंडळांची मोठी लाईन आहे.

डीजेवर बंदी असल्याने आज सकाळी सहा ते नऊ या काळात अनेक मंडळांनी निषेध नोंदवत मिरवणूक बंद ठेवली होती. तर, काही ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वादही घातला. पोलिसांनी डीजेचा मिक्सरच काढून घेतल्याने कार्यकर्ते हतबल झाले होते. 

हे रस्ते आहेत बंद :

  • लक्ष्मी रस्ता
  • केळकर रस्ता
  • कुमठेकर रस्ता
  • बाजीराव रस्ता
  • शिवाजी रस्ता
  • जंगली महाराज रस्ता
  • टिळक रस्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com