कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाशेजारीच आणखी तीन-चार रिक्षा थांबविणे, रस्त्याच्या मध्यभागी अचानक रिक्षा उभी करून प्रवासी उतरविणे, दुसरा प्रवासी येईपर्यंत त्याच ठिकाणी रिक्षा उभी करणे, चालत्या ‘पीएमपी’ बससमोरच रिक्षामध्ये प्रवासी बसविणे...अशा असंख्य उदाहरणांमधून स्वारगेटच्या जेधे चौकातील रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा फटका प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

`बस बे’समोर थांबण्याऐवजी बहुतांशी ‘पीएमपीएल’च्या बस रस्त्यांच्या मध्यभागी थांबतात. अशा बसमध्ये चढतानाच अचानक पाठीमागून भरधाव बस येते. दोन्ही बसच्या मध्ये चेंगरण्याच्या भीतीपोटी वृद्ध, महिला प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन दरवाजाच्या दिशेने धावत असल्याची सद्यःस्थिती आहे.
 
खासगी टॅक्‍सी, पियाजोचीही डोकेदुखी
स्वारगेट पोलिस ठाणे, एसटी बस स्थानकाचे प्रवेशद्वार, बस स्थानक, जिजाऊ उपाहारगृह, वारजे-माळवाडी बसथांबा या ठिकाणी बेशिस्तीचा हा प्रकार ठळकपणे निदर्शनास येतो; तर दुसरीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी टॅक्‍सीची वाढती संख्या, पियाजोमधून सर्रास सुरू असलेली अवैध वाहतूक हीदेखील डोकेदुखी बनली आहे. 

पावत्या फाडण्याला प्राधान्य
या बेशिस्तीकडे काणाडोळा करणारे वाहतूक पोलिस या वाहनांवर कोणताही कारवाई करत नाहीत; परंतु परगावचे वाहन दिसताच बाजूला घेऊन त्यांच्याकडून पावत्या फाडण्यालाच ते प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

प्रवासी, नागरिकांच्या जिवाशी खेळ
सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या ‘पीएमपी’ बसचे चालकही या बेशिस्तीला हातभार लावत आहेत. बसथांब्यापेक्षा रस्त्याच्या मध्यभागी बस थांबविण्याला त्यांची अधिक पसंती आहे. सतत गजबजलेल्या या चौकात चालकांमधील भरधाव बस चालविण्याची स्पर्धा प्रवासी आणि नागरिकांच्या अक्षरशः जिवाशी खेळ करणारी आहे.

Web Title: traffic in swargate