लोकवस्तीजवळील मासळी बाजाराच्या स्थलांतराची मागणी

प्रशांत चवरे
सोमवार, 23 एप्रिल 2018

भिगवण (पुणे) : तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मासळी बाजार सुविधांच्या अभावाचे कारण पुढे करत पंधरा दिवसांपुर्वीच येथील इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये स्थलांतरीत करण्यात आला होता. नवीन मासळी बाजार हा लोकवस्तीजवळ असल्यामुळे रहिवाशांना मासळीच्या वासाचा त्रास होत असल्याची तक्रार येथील तसेच तक्रारवाडी (ता.इंदापुर)येथील ग्रामस्थांकडुन होत आहे. लोकवस्तीजवळ असलेला मासळी बाजार लोकवस्ती नसलेल्या भागांमध्ये किंवा पुर्ववत तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथील जागेमध्ये स्थलांतरीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

उजनी जलाशयातील गोड्या पाण्याच्या माशांसाठी भिगवण येथील मासळी बाजार पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये परिचित आहे. भिगवण येथील मासळी बाजार तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या गाळ्यांमध्ये मागील पंधरा वर्ष भऱत होता. या ठिकाणी पुणे, सोलापुर, अहमदनगर, सातारा आदीं जिल्ह्यासह राज्यातील मत्स व्यापारी मासळी खरेदीसाठी येत होते. तक्रारवाडी येथील मासळी बाजारांमध्ये असुविधा होत असल्याचे व मासळी बाजाराच्या वाढीस मर्यादा येत असल्याचे कारण पुढे करत हा बाजार भिगवण येथील उपबाजार आवारांमध्ये राष्ट्रीय मत्स्यकी विभागाच्या आर्थिक सहकार्यातुन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आला होता. येथे मासळी आडतदारांसाठी गाळे, काटेधारकांसाठी शेड, पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उपलब्ध सुविधांबद्दल मासळी व्यावसायिकही समाधानी नाहीत. 

नव्याने उभारलेला मासळी बाजार हा लोकवस्तीपासुन जवळ असल्यामुळे पंधरा दिवसांमध्येच येथील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे. मासळीच्या वासांमुळे या भागातील लोकांचे आरोग्यच धोक्यात आले असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. बाजारपेठेपासुन मासळी बाजार जवळच असल्यामुळे त्याचा परिणाम येथील व्यापारी पेठेवर होत असल्याची चर्चा आहे. येथील मासळी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकवस्ती नसलेल्या भागांमध्ये किंवा पुर्ववत तक्रारवाडी येथील गाळ्यांमध्ये स्थलांतरीत करावा अशा मागणी आहे. 

याबाबत येथील रहिवासी अॅड. महेश देवकाते म्हणाले, नव्याने स्थलांतरीत करण्यात आलेला मासळी बाजार लोकवस्तीजवळ असल्यामुळे त्याच्या वासाचा त्रास हा भिगवण व तक्रारवाडी ग्रामस्थांना होत आहे. सातत्याने येत असलेल्या वासांमुळे लोक आजारी पडु लागले आहे. बाजारपेठेलाही याचा फटका बसत आहे. सदर मासळी बाजार हा इतरत्र स्थलांतरीत करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे त्याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.

Web Title: transfer of fish market from homes demand by villagers