लाखो पुणेकरांची साखळी करणार वाहतूक नियमांचा जागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

पथनाट्ये, व्यंग्यचित्रे याद्वारेही होणार प्रबोधन

पुणे - सुमारे एक लाख पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर उद्या (गुरुवारी) सकाळी रस्त्यावर उतरतील, जवळपास सर्वच प्रमुख चौकांमध्ये तब्बल शंभर किलोमीटर अंतराची मानवी साखळी करतील, सकाळी अकरा वाजता शहरातील सगळी वाहतूक दोन मिनिटांसाठी आहे त्याच जागी थांबेल अन्‌... सर्व जण एकमुखाने शपथ घेतील ‘आम्ही वाहतुकीचे नियम पाळू...’ 

ही असेल पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात येणारी जनजागृतीची मोहीम. या मोहिमेत ‘सकाळ’ माध्यम समूहाचा सक्रिय सहभाग राहील. ठिकठिकाणी पथनाट्ये होतील, काही ठिकाणी रांगोळ्या तर काही ठिकाणी व्यंग्यचित्रे काढली जातील. यांतून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर ढवळून निघेल. यातून नागरिकांच्या मनात त्यांची सुरक्षितता जपणाऱ्या वाहतुकीच्या शिस्तीचे महत्त्व ठसेल.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त सुनील रामानंद यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेने ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्यात ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, 

वाहतुकीचे किमान हे तरी नियम पाळा
झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाइनवर वाहन थांबवा
लाल दिवा लागल्यानंतर वाहन थांबवा
हॉर्नचा वापर टाळा
सीट बेल्ट/ हेल्मेटचा वापर करा
ॲम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता द्या
 
मी शपथ घेतो की...
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे माझे कर्तव्य
नियम पाळण्यासाठी स्वत:पासून सुरवात करणार
वाहतुकीचे नियम तोडणे धोक्‍याचे, याची मला जाणीव
नियमांचा भंग करणाऱ्याचे अनुकरण करणार नाही
शहराच्या संस्कृतीचा मला अभिमान, त्यासाठी सदैव कटिबद्ध 
शिस्तबद्ध शहर म्हणून नावलौकिक मिळवून देईन

वाहतुकीचे प्रमुख नियम  
झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाइनवर वाहन थांबवा
लाल दिवा लागल्यानंतर वाहन थांबवा
हॉर्नचा वापर टाळा
सीट बेल्ट/ हेल्मेटचा वापर करा
ॲम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता द्या
 
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिस आयुक्‍तालयाच्या शहर वाहतूक शाखेकडून ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेचा घटक बनून वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी योगदान द्यावे. 
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त (वाहतूक)

Web Title: transport rule publicity

टॅग्स