पुणे ते गोवा सायकल प्रवास करून दिला स्वच्छतेचा संदेश

Traveled from Pune to Goa and delivered a message of cleanliness
Traveled from Pune to Goa and delivered a message of cleanliness

नवी सांगवी - स्वच्छतेचा संदेश घेऊन पिंपळे गुरव ते गोवा हा सायकल प्रवास पिंपळे गुरव येथील तीन युवकांनी नुकताच पार पाडला. माऊली जगताप, हेमंत पाडुळे व विशाल कदम या तीन तरूणांनी चार दिवसांत 450 किलोमिटर अंतर पार करून तरूणाई समोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले हे युवक ऐरवी व्यायाम व हौशेखातीर सायकल चालवित होते. परंतु केंद्र सरकारने चालविलेले स्वच्छ भारत हे अभियानात आपलेही अगदी खारीचे नाही तर मुंगीचे योगदान असावे या उद्देशाने या तरूणांनी सायकल सवारी करून आपले योगदान दिले. 

दुबई, हाँगकाँग, चीन सारख्या देशात उद्योग व पर्यटनासाठी माऊली जगताप यांनी प्रवास केला. तेथील सार्वजनिक स्वच्छता पाहता आपल्या देशातही असा निटनेटकेपणा यावा असा विचार त्यांच्या मनात नेहमी पडत असे. परंतु केवळ आपल्या सिस्टिमला दोष देऊन आपण यातून बाहेर पडु शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सुरु केलेल्या या अभियानाचा छोटासा भाग म्हणून या तिघांनी चार दिवसात पुणे गोवा गावागावात लोकांशी संपर्क साधून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सकाळी सहा ते नऊ सायकलवर सवार होऊन पहिला टप्पा पुर्ण करायचा थोड थांबून चहा नाष्टा केल्यानंतर 10 ते दुपारी 1 व सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत असा त्यांचा दिनक्रम होता. पहिले दोन दिवस प्रत्येकी 150 किमी अंतर यांनी पार केले व शेवटचे दोन दिवस प्रत्येकी 80 किमी अंतर पार करून गोव्याचे पणजी शहर गाठले.   

माऊली जगताप म्हणाले, "दुपारी 1 ते चार पर्यंत आम्ही रस्त्याला एखाद्या शेतात थांबून तेथील स्थानिकांशी स्वच्छतेच्या संदर्भात संवाद साधत होतो. कर्नाटकातील निपानी घाट पार केल्यावर पुढे घाटात भरपूर झाडे असल्याने उन्हाळा जाणवला नाही. एवढ्या मोठ्या हायवेवर कोठेही आंम्हाला चारचाकी अथवा जड वाहणांनी त्रास दिला नाही. उलट आमच्या पोषाखावरून पुढे जाण्यास आंम्हाला सहकार्य करीत होते."

कडक उन्हाळा... 40 डिग्रीच्या आसपास तापमान... असे असताना साडेचारशे किमीचा सायकल प्रवास सोपा नाही. किंबहुना तो जीवघेणाही होऊ शकतो. त्यामुळे हे अभियान तुर्त तरी टाळा असे अनेकांनी सल्ले देऊनही या तरूणांनी पुर्ण केले. शुध्दपाणी, लिंबुपाणी जास्तीत जास्त पिऊन व ओला रूमाल डोक्यावर परिधान करून सरासरी 20 किमीदर तासाला हा वेग ठेऊन प्रवास निर्धास्त पार पाडल्याचे माऊली जगताप यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com