शरद पवारांच्या उपस्थितीत हिंद केसरी गणपतराव आंदळकरांना आदरांजली

sharad pawar
sharad pawar

कात्रज : देश विदेशात सर्वोच्च यश आणि हिंद केसरी किताब मिळवूनही गणपतरावांचे पाय जमिनीवर होते, कुस्तीबाबत त्यांना प्रचंड आस्था होती, त्यांनी देशाचा लौकिक वाढवणारे अनेक मल्ल घडवले, त्यांच्याप्रमाणेच कुस्तीशी प्रामाणिक राहून त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे हिच त्यांना आदरांजली ठरेल अशी भावना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

भारतीय कुस्ती क्षेत्रातील प्रथितयश मल्ल हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी आंदळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनीही आदरांजली वाहिली. यावेळी परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, माजी खासदार अशोकअण्णा मोहोळ, काका पवार, कैलास मोहोळ, बालाजी गव्हाणे, अमोल बुचडे, दत्ताजी गायकवाड, विजय गावडे, अमोल बराटे, योगेश दोडके उपस्थित होते.

संयोजक मोहोळ कुस्ती संकुलाचे कार्यवाह वस्ताद माऊली मांगडे, कृष्णा फिरंगे, सयाजी जाधव आणि स्थानिक नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, युवराज बेलदरे यांच्यासह संतोष फरांदे, सुधीर कोंढरे, कुलदिप कोंडे, रमेश कोंडे, यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com