दागिने पॉलिशच्या बहाण्याने महिलेची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : सेल्समन असल्याचा बहाणा करून घरात प्रवेश केलेल्या दोघा भामट्यांनी दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक केली. ही घटना मामुर्डी येथील शितळानगर (नंबर १) मध्ये घडली. दरम्यान पोलिस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या तात्काळ प्रतिसाद टीमने केलेल्या तपासात काही मिनिटातच कारवाई करून दोघा भामट्यानां जेरबंद केले आहे.

रणजित गेंदालाल साह (वय ४० वर्ष )आणि अभिंनदन उर्फ नंदकुमार दशरथ साह (वय २३ वर्ष,दोघे रा यमुनिया थाना अंचल,साहू परबत्ता जि भागलपूर बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीवरून, आरोपींचा कात्रजच्या दिशेने जात असताना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. तसेच मोटार सायकल, दागिने पॉलिश करण्याचे साहित्य जप्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरनचे उपनिरीक्षक मनोज पवार तसेच सहाय्यक फोजदार सुभाष सावंत, पोलीस नाईक प्रमोद उगले, पोलीस हवालदार संतोष बगाड, एन. एस. गडाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com