दोन गटांतील भांडणामुळे पर्वती दर्शन येथे तणाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - पर्वती दर्शन येथे दोन गटांमध्ये झालेल्या भांडणामुळे रविवारी दुपारी तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. 

पुणे - पर्वती दर्शन येथे दोन गटांमध्ये झालेल्या भांडणामुळे रविवारी दुपारी तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. 

पर्वती दर्शन येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या मागील बाजूस असलेल्या परिसरामध्ये दोन गटांमध्ये काही दिवसांपासून वाद आहेत. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन्ही गटांमध्ये भांडणे झाली. त्यापैकी एका गटाच्या सदस्याने दुसऱ्या गटातील नागरिकांना धमकावल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ केली. मुख्यालयातील राखीव पोलिस दलाची कुमक मागवून बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला. 

Web Title: Two groups fight in pune

टॅग्स