"ईव्हीएम'मशिनबाबत उपोषण करणाऱ्या दोघांना त्रास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत "ईव्हीएम' मशिनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत त्याविरोधात भाजपसोडून सर्वपक्षीय उमेदवारांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला आज (ता. 9) वेगळे वळण लागले असून, उपोषणकर्त्या दोघांना त्रास होत असल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, आज उपोषणाचा सहा दिवस आहे. 

महापालिका निवडणुकीत "ईव्हीएम' मशिनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करून पराभूत उमेदवार आणि माहिती अधिकारात काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून विधान भवन येथे हे उपोषण सुरू आहे. दरम्यान, आज दुपारी उपोषणकर्ते हनीफ शेख आणि भारत कांबळे यांना त्रास झाला. त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बाळासाहेब बोडके आणि दत्ता बहिरट यांनी दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खासदार वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर दीपक मानकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषण सुरू असूनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याची तक्रार या वेळी उपोषणकर्त्यांनी केली. 

दरम्यान, याप्रकरणी खासदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू असूनदेखील आपण व प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. हे योग्य नसून, तत्काळ त्यांची भेट घेऊन मागण्या शासन स्तरावर पोचवाव्यात, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Two of the hunger strike trouble