सेवेत त्रुटी ठेवल्याबद्दल बिल्डरला दोन लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, सहकारी गृहरचना संस्था स्थापन करावी, कन्व्हेयन्स डीड करून द्यावे, तसेच 2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने बांधकाम व्यावसायिकाला दिला आहे. या प्रकरणी तीस ग्राहकांनी मंचाकडे दाद मागितली होती. 

पुणे - बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, सहकारी गृहरचना संस्था स्थापन करावी, कन्व्हेयन्स डीड करून द्यावे, तसेच 2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने बांधकाम व्यावसायिकाला दिला आहे. या प्रकरणी तीस ग्राहकांनी मंचाकडे दाद मागितली होती. 

सृष्टी डेव्हलपर्स, सुहास मते, सुधीर मते, शिवाजी गंदाले, अमित गंदाले, शैला दारवटकर आणि भागीदारांविरुद्ध तीस ग्राहकांनी न्यायमंचाकडे दाद मागितली होती. वडगाव खुर्द येथे संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी "साई सृष्टी' हा गृहप्रकल्प उभा केला. या ठिकाणी असलेल्या 22 सदनिकाधारक आणि सहा दुकानदारांनी ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागत बांधकाम व्यावसायिकाने सहकारी गृहरचना संस्था स्थापन करून दिली नाही, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला नाही, प्रकल्पाच्या माहितीपत्रकानुसार सोयीसुविधा दिल्या नाहीत, लिफ्ट बसविली नाही, अशा विविध तक्रारी केल्या होत्या. बांधकाम व्यावसायिकाने सेवेत त्रुटी ठेवल्याने त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या ग्राहकांनी केली होती. याबाबत बांधकाम व्यावसायिकांनीही बाजू मांडली. सेवेत त्रुटी ठेवल्या नसल्याचा दावाही त्यांनी केला. सहकारी गृहरचना संस्था स्थापन करण्यासाठी ग्राहकांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. कोठेही अतिक्रमण केलेले नाही, पार्किंगसाठी पुरेशी जागा ठेवण्यात आली आहे, असा दावा त्यांनी करीत तक्रार निकाली काढण्याची विनंती केली होती. 

न्यायमंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य ओंकार पाटील यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर ग्राहकांची बाजू ग्राह्य मानत बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना 90 दिवसांत 2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, सहकारी संस्था स्थापन करून द्यावी. तसेच ग्राहकांच्या इतरही मागण्या पूर्ण कराव्यात असे आदेश दिले.

टॅग्स

पुणे

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM