पुणे - चिंचवडमध्ये दोन दुकाने फोडली 

संदीप घिसे 
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : चिंचवड पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावर असलेली दोन दुकाने चोरट्यांनी फोडली, ही घटना मंगळवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली.

पिंपरी (पुणे) : चिंचवड पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावर असलेली दोन दुकाने चोरट्यांनी फोडली, ही घटना मंगळवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली.

चिंचवडगाव येथील चापेकर चौक ते जुना जकात नाका या दरम्यानच्या रस्त्यावर असलेले गिफ्ट गॅलरी आणि हिमगिरी प्लायवूड ही दोन दुकाने चोरट्यांनी फोडली. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दुकानांचे शटर उचकटून आतील काही रक्कम चोरीस गेल्याचे समजते. मात्र याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
 
पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावरील ही दुकाने फोडल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी चिंचवड गावामधील पॉवर हाऊस चौकात असलेले महावीर मेडिकल हे औषधांचे दुकानही चोरट्यांनी फोडले. मात्र याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Web Title: two shops looted in chinchwad pune