पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला शिक्षा

court.jpg
court.jpg

नांदेड : अल्पवयीन पुतणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मावशाला येथील चौथे जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये रोख दंड अशी शुक्रवारी (ता. १७) शिक्षा ठोठावली आहे.

मुखेड तालुक्यात राहणारी एक १६ वर्षीय युवती शिक्षण घेण्यासाठी नांदेडच्या खाजगी वस्तीगृहात राहत होती. बडूर (ता.बिलोली) येथील या युवतीचा मावशा यादव चांदोबा दावलेकर (वय २६) हा १२ फेब्रुवारी २०१५ रोजी दुपारी पुतणीला घेऊन तरोडा नाका येथे गेला. आणि तेथून गायब झाला. पुढे आपल्या पुतणीला यादव दावलेकरने हैद्राबाद, निजामबाद येथे घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

याबाबतची तक्रार १५ फेब्रुवारी २०१५ रोजी त्या युवतीच्या आईने दिल्यानंतर भाग्यनगर पोलि्सांनी भारतीय दंडविधानाच्या कलम ३६३ आणि ३७६, यासोबत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलमे तीन आणि चा नुसार गुन्हा दाखल केला. भाग्यनगरच्या पोलीस उपनिरिक्षक अमृता बोरचाटे यांनी या प्रकरणातील यादव दावलेकरला अटक केली. त्यानंतर तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

न्यायालयात याप्रकरणी नऊ साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्या आधारे न्यायाधीश वाघमारे यांनी आपल्या पुतणीवर अत्याचार करण्यासाठी यादव दावलेकरला दोषी मानले. भारतीय दंडविधानातील कलम ३६३ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड, तसेच पोस्को कायद्यानुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा यादव दावलेकरला एकत्रित भोगायच्या असल्याचे सहाय्यक सरकारी वकील ॲड. यदुपत अर्धापूरकर यांनी दिली. या खटल्यात सुरूवातीच्या काळात जिल्हा सरकारी वकील ॲड. अमरिकसिंघ वासरीकर यांनी बाजू मांडली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com