महापुरुषांना जाती धर्मात सिमीत करण्याचा दुर्दैवी प्रयत्न ; खा.डॉ.कोल्हे

नारायणगाव येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रतिपादन
babasheb ambedkar jayanti
babasheb ambedkar jayanti sakal

नारायणगाव : महापुरुष व युगप्रवर्तक यांनी माती, माता आणि मातृभूमी या गोष्टींना सर्वोच्च मानून सर्व जातीधर्माच्या लोकांच्या उद्धारासाठी काम केले आहे. कोणत्याही युगप्रवर्तकाने कोणत्याही एकाच जातीसाठी, समाजासाठी किंवा धर्मासाठी कार्य केले नाही.महापुरुषांना एका जातीत आणि धर्मात सिमीत करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे.असे मत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

येथील मुक्ताबाई समाज मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने युग प्रवर्तकांचा संयुक्त जयंती महोत्सव या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवशाही ते लोकशाही या विषयावर प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान झाले.या निमित्ताने शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप जोशी, पाली भाषा अभ्यासक अतुल भोसेकर, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, सरपंच योगेश पाटे, समाजसेवक जालिंदर डोंगरे,आदर्श शिक्षक संजय रणदिवे , सचिन भोजणे ,भटकंती ट्रेकर्स ग्रुप चे विवेकानंद कडलक यांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे , तहसीलदार रविंद्र सबनीस ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वाव्हळ , उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे, महेश शेळके, आरिफ आतार, संतोष दांगट, रमेश हांडे , सूरज वाजगे ,गणेश वाजगे आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भाषा, संस्कृती , जाती , धर्म , अशा वैविध्यपूर्ण असणाऱ्या भारत देशाला संविधानाच्या माध्यमातून एकसंध बांधून ठेवले आहे.कोणत्याही युगप्रवर्तकाचे सामाजिक काम विशिष्ट जाती व घटकासाठी सीमित नव्हते.आपण प्रत्येक महापुरुषाला धर्माची चौकट घालून त्यांच्या गळ्यात जातीचा हार घातला.देश एकसंध ठेवण्यासाठी हे योग्य नाही. आमदार बेनके म्हणाले येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळी दरम्यान २३ व २४ मे १९३१ रोजी मुक्काम केला होता.या ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचे स्मारक करण्यासाठी खासदार डॉ.कोल्हे व मी पाठपुरावा करत आहे.डॉ.शिवाजी सोनवणे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com