मांजरी - उपसरपंचाने उभारला स्वखर्चाने विसर्जनघाट 

manjari
manjari

मांजरी - येथील मुळा- मुठा नदी तीरावरील गैरसोय लक्षात घेऊन उपसरपंच अमित घुले यांनी स्वखर्चाने गणेशविसर्जन घाटाची उभारणी केली आहे. तसेच प्रवाहात विसर्जनासाठी मोफत होड्यांची सोय केली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

या ठिकाणी हडपसर, पंधरा नंबर, केशवनगर, महादेवनगर  व मांजरी परिसरातील बहुसंख्य गणेशभक्त मुर्ती विसर्जनासाठी येत असतात. परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे दरवर्षी येथे विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, विसर्जनाच्या ठिकाणी समतल व स्वच्छ जागा नसल्याने भक्तांना मोठात्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन उपसरपंच घुले यांनी स्वखर्चाने येथील घाटाची यंत्राच्या साह्याने दगड, मातीमध्ये बांधनी करून घेतली आहे. याशिवाय या परिसराची स्वच्छताही केली आहे. त्यामुळे विसर्जना आगोदर आरतीसाठी मुर्ती व साहित्याची मांडणी करणे सोयीस्कर झाले आहे. विसर्जनासाठी होडीत बसताना धोकादायक परिस्थिती निर्माण होत होती. या घाटाच्या कामामुळे धोका कमी होण्यास मदत झाली आहे. तरीही भक्तांच्या जिविताला धोका होऊ नये म्हणून येथे जीव रक्षकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य पाण्यात न सोडण्याचे आवाहन घुले यांनी केले असून ते गोळा करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

उपसरपंच घुले म्हणाले,"या ठिकाणी गणेशविसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याआधी येथील विसर्जनापूर्वीची आरती करण्यासाठी सपाट जागा नव्हती. भक्तांना चिखलातच किंवा एखाद्या खडकावर मूर्ती ठेवून आरती करावी लागत होती. तसेच नदीकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल तुडवतच भाविकांना विसर्जन करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन घाटाचे काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com