उरुळीला टॅंकर वाढविणार - महापौर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - रहिवाशांच्या मागणीनुसार उरुळी देवाची गावातील कामे पुढील आठवड्यापासून हाती घेतली जातील. त्यामुळे गावकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतील, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी सांगितले. तसेच रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी टॅंकरची संख्या वाढविण्याची सूचनाही महापौर टिळक यांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. 

या गावांतील विविध मागण्यांसाठी लोकप्रतिनधी आणि गावकऱ्यांचे शिष्टमंडळ सोमवारी महापौर टिळक यांना भेटले. तेव्हा प्रस्तावित कामे लगेचच सुरू करण्याचे आश्‍वासन महापौरांनी त्यांना दिले. रहिवाशांचा प्राधान्यक्रम ठरला असून, विशेषत: रस्ते, पाणी, वाहतूक, वीज आणि आरोग्य या बाबी पुरविण्याची मागणी असल्याचे लोकप्रतिनिधींनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. 
या वेळी झालेल्या बैठकीला महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, उरळी देवाचीचे उपसरपंच प्रशांत भाडळे, पंचायत समिती सदस्य संतोष भाडळे, भगवान भाडळे आदी उपस्थित होते.

नव्या गावांमधील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यात ९८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. उरुळी देवाची येथील सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या कामांचे उद्‌घाटन पुढील आठवड्यात करून ती सुरू केली जातील.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे मनपा

Web Title: urali kanchan water tanker increase mukta tilak