उस्ताद जाकिर हुसेन यांचा रविवारी पुण्यात कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - ‘सा’ व ‘नी’ संस्थेतर्फे उस्‍ताद जाकिर हुसेन यांचा 'ताल चर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या रविवारी (ता. २७) रोजी गणेश कला क्रीडा मंदिर येथे संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

पुणे - ‘सा’ व ‘नी’ संस्थेतर्फे उस्‍ताद जाकिर हुसेन यांचा 'ताल चर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या रविवारी (ता. २७) रोजी गणेश कला क्रीडा मंदिर येथे संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमामध्ये उस्तादजींचा सोलो तबलावादन आणि त्यानंतर अनंथा कृष्णन्‌ (मृदंगम) नवीन शर्मा (ढोलक) आणि जाकिरजी (तबला) यांचा सवाल जवाब आणि एकत्र वादन होणार आहे. त्यांना नगम संगत तन्मय देवचके हे करणार आहेत. संपूर्ण जगभर हा कार्यक्रम गाजला असून, पुण्यात प्रथमच याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तिकीटविक्री मराठे ज्वेलर्स लक्ष्मी रोड, बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि टिळक स्मारक मंदिर येथे असून, वरील सर्व ठिकाणी डेबिट/ क्रेडिट कार्डने पेमेंट करता येईल. 

यामध्ये विद्यार्थ्यांसाठी १ हजार आणि सहाशे रुपयांच्या तिकिटांवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सा’ व ‘नी’ सूर संगीतचे संस्थापक सुरेंद्र मोहिते यांनी दिली. कार्यक्रमा दिवशी कार पार्किंगची व्यवस्था गरवारे बालभवन, सारसबागेसमोर करण्यात आलेली आहे.

Web Title: Ustad Zakir Hussain on Sunday's program in Pune

टॅग्स