सरपंच वैभव गायकवाड यांचे कुणबी प्रमाणपत्र वैध

vaibhav-gayakwad.
vaibhav-gayakwad.

करंजेपूल (बारामती) - गावचे सरपंच वैभव अशोक गायकवाड यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत दोघांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याबाबत सुनावण्या घेऊन वैभव गायकवाड यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध ठरविण्याचा आदेश पारित केला आहे. यामुळे वैभव गायकवाड यांच्या सरपंचपदापुढील धोका टळला आहे.

डिसेंबर 2017 मध्ये करंजेपूल गावच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत वैभव गायकवाड हे इतर मागासवर्ग प्रवर्गातून जनतेतून सरपंचपदी निवडून आले. तहसीलदारांमार्फत जात पडताळणी समितीकडे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रकरण दिले होते. यानंतर विजय सखाराम ओव्हाळ यांनी, कागदपत्रे बनावट दिल्याची तर शिवाजी दत्तात्रेय गायकवाड यांनी आम्ही भाऊकीतले असून हिंदू-मराठा आहोत. समितीची दिशाभूल होत आहे अशी तक्रार केली होती. याबाबत जिल्हा जात पडताळणी समितीने सदर प्रकरण चौकशीसाठी दक्षता पथकाकडे प्रकरण वर्ग केले. हि. शां. गाढे, वासुदेव पाटील व डॅा. सदानंद पाटील यांच्या समितीसमोर सुनावण्या पार पडल्या. तक्रारदार व अर्जदार यांना लेखी पुरावे सादर करण्याची संधी दिली. अखेरीस तक्रारदार पुराव्यानिशी समितीसमोर तक्रार सिध्द करू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या अर्ज फेटाळण्यात आला. तसेच समितीने, वैभव गायकवाड यांचे वाडवडिल कायमस्वरूपी महाराष्ट्र वास्तव्यास असल्याने व ते कुणबी सिध्द होत असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्रही वैध ठरविले आहे. या निर्णयामुळे गायकवाड यांचे सरपंचपद तर कायम राहिलेच आहे शिवाय उपविभागीय अधिकारी बारामती व तहसीलदार बारामती यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे.  

समितीने वैभव गायकवाड यांचा कुणबी दाखला मान्य केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, वैभव गायकवाड यांच्या पूर्वजांचा 1912 सालचा कुणबी उल्लेख असलेला जन्माचा व मृत्यूचा दाखला, वंशावळ सिध्द करण्याचे दाखले, जमीनीतही कुणबी उल्लेख असलेले उतारे याआधारे हा निर्णय देत असल्याचे समितीने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com