सकाळ सोसायटी संवाद अंतर्गत हौसिंग सोसायटीमध्ये विविध स्पर्धा

संदिप जगदाळे
रविवार, 27 मे 2018

सकाळ सोसायटी संवाद अंतर्गत यश रवि पार्क हौसिंग सोसायटीमध्ये महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककृती व खुल्या नृत्य स्पर्धस उत्फुर्त प्रतिसाद लाभला. पाककला स्पर्धेत महिलांनी विविध स्वादिष्ट पदार्थ बनविले होते. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची होती. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यातील कला लोकांपुढे आणताना त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.ही स्पर्धा शनिवारी (ता.२६) सायंकाळी संपन्न झाली.

हडपसर (पुणे) - सकाळ सोसायटी संवाद अंतर्गत यश रवि पार्क हौसिंग सोसायटीमध्ये महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककृती व खुल्या नृत्य स्पर्धस उत्फुर्त प्रतिसाद लाभला. पाककला स्पर्धेत महिलांनी विविध स्वादिष्ट पदार्थ बनविले होते. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची होती. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यातील कला लोकांपुढे आणताना त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.ही स्पर्धा शनिवारी (ता.२६) सायंकाळी संपन्न झाली. पन्नासहून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत मिनाक्षी बचाटे यांनी बनविलेल्या पुडींग जार या पदार्थास प्रथम, दिव्या त्रिवेदी यांच्या घेवर पदार्थास द्वितीय, प्रिया लोकवानी यांच्या दालक्कवात पदार्थास तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये अरूणा गांगुली यांच्या बंगाली पायसम तर संगीता साहू यांच्या व्हेज चॅाप या पदार्थांना बक्षिस देण्यात आले. 

खुल्या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक माही बागला, द्वितीय क्रमांक सानवी सिंह, तृतीय क्रमांक निकीता जैन यांना मिळाला तर उत्तेजनार्थ ध्रीती पुराणीक, मुग्धा उफसेंचवार, सई गव्हगव्हे यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सुजात नेरूरकर, उषा लोकरे, विद्या ताम्हणकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी नगरसेवक नाना भानगिरे यांचे विशेष सहकार्य लाभले. सोसायटीचे अध्यक्ष वैभव माने, नारायणला त्रिवेदी, दासू दुनवत यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. 

स्पर्धक प्रियांका शर्मा म्हणाल्या, सकाळ माध्यम समुहाने आमच्या सोसायटीत पाककृती व खुली नृत्य स्पर्धा घेतल्याने आम्ही सकाळला धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रांतातील पाककृती आम्हाला पहायला मिळाली. या निमित्ताने महिला एकत्र आल्या. त्यामुळे परस्परांतील ज्ञानाची देवान घेवाण या माध्यमातून होण्यास मदत होईल नगरसेवक भानगिरे यांनी स्पष्ट केले. सकाळ माध्यम समुह नेहमीच समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवित असतो. शहराच्या पश्चिमेला महिलांसाठी विविध कार्यक्रम होतात. मात्र पूर्व उपनगरात या प्रकारचे कार्यक्रम कमी होतात. त्यामुळे प्रत्येक सोसायटीत अशा प्रकारची स्पर्धो घेतली तर महिलांना त्यांचे कलागुण सादर करण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Various competitions in the Housing Society