वसंतोत्सव यंदा रंगणार 20-22 जानेवारीदरम्यान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

महोत्सवात ज्येष्ठ बासरीवादक रोणू मुजुमदार व मोहनवीणेस जागतिक दर्ज मिळवून दिलेल्या पं विश्वमोहन भट यांचेही सादरीकरण होणार आहे.

पुणे - पंडित वसंतराव देशपांडे यांच्या हृद्य स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येत असलेला संगीताचा महोत्सव "वसंतोत्सव' येत्या 20 ते 22 जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या या महोत्सवाचे यंदाचे वर्ष हे दशकपूर्तीचे वर्ष आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हा महोत्सव विनामूल्य असणार आहे.

या महोत्सवाची कार्यक्रमपत्रिका अशी -
- पहिल्या दिवशी 'संगीत मानापमान' नाटकाचा प्रयोग रंगणार
- दुसऱ्या दिवशी गायिका रेखा भारद्वाज यांचं सुफी गायन ऐकता येणार
- याचबरोबर, अखेरच्या दिवशी 'इंडियन ओशन' या ख्यातनाम रॉक बॅंडचा आविष्कार

याशिवाय, महोत्सवात ज्येष्ठ बासरीवादक रोणू मुजुमदार व मोहनवीणेस जागतिक दर्ज मिळवून दिलेल्या पं विश्वमोहन भट यांचेही सादरीकरण होणार आहे. या भरगच्च कार्यक्रमासोबत वसंतोत्सवामध्ये यंदा ज्येष्ठ गायिका सुलभा ठकार आणि ऑर्गन वादक राजीव परांजपे यांचा सन्मान होणार आहे.