वाहनांची ‘क्रॅश टेस्ट’ होणार सक्तीची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी; ‘एआरएआय’ची चाकण येथे चाचणी
पुणे - सुरक्षित प्रवासाची हमी देतील, अशा मोटारी ऑक्‍टोबरपासून रस्त्यावर उतरणार आहेत. कारण त्या दिवसापासून ‘क्रॅश टेस्ट’ म्हणजे अपघातात दोन वाहनांची टक्कर किंवा धडक झाल्यास होणाऱ्या परिणामांची चाचणी सर्व मोटार उत्पादकांसाठी सक्तीची केली आहे.

त्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) चाकण येथे तशी सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी; ‘एआरएआय’ची चाकण येथे चाचणी
पुणे - सुरक्षित प्रवासाची हमी देतील, अशा मोटारी ऑक्‍टोबरपासून रस्त्यावर उतरणार आहेत. कारण त्या दिवसापासून ‘क्रॅश टेस्ट’ म्हणजे अपघातात दोन वाहनांची टक्कर किंवा धडक झाल्यास होणाऱ्या परिणामांची चाचणी सर्व मोटार उत्पादकांसाठी सक्तीची केली आहे.

त्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) चाकण येथे तशी सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

‘एआरएआय’च्या संचालिका रश्‍मी उर्ध्वरेषे आणि ऑटोमोटिव्ह इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागाचे सहायक संचालक आनंद देशपांडे यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला नुकतीच भेट दिली, त्या वेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. ‘क्रॅश टेस्ट’बरोबरच ‘भारत स्टेज ४ इमिशन नॉर्म’च्या अंमलबजावणीची लवकरच सुरवात होईल असे त्यांनी नमूद केले.

अर्ध्वरेषे म्हणाल्या, ‘‘ताशी ५६ किमी वेगाने दोन मोटारींची टक्कर झाल्यास वाहनातील प्रवाशांना कितपत सुरक्षितता मिळते, हे बघण्यासाठी ‘क्रॅश टेस्ट’ करण्यात येणार आहे. समोरासमोर, कडेने, समोरील बाजूस तिरक्‍या पद्धतीने अपघात झाल्यास होणाऱ्या परिणामांची नोंद या चाचण्यांत करण्यात येईल. आपल्या देशात ‘भारत न्यू व्हेईकल सेफ्टी ॲसेसमेंट प्रोग्रॅम’ राबविण्यात येणार आहे.’’

आंतरराष्ट्रीय परिषद उद्यापासून
‘एआरएआय’तर्फे १८ ते २१ जानेवारी दरम्यान ‘सिम्पोसियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्‍नॉलॉजी’ (सिॲट) ही द्विवार्षिक परिषद भरविण्यात येत आहे. ‘ॲक्‍टिव्ह ॲण्ड पॅसिव्ह सेफ्टी’, पर्यायी इंधन, चालकविरहित वाहने, प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान, ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्टेशन’ आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या ‘बीएस ४ इमिशन नॉर्म’ची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून करण्यात येणार आहे. यापुढील काळात इंधनाचा दर्जा सुधारण्याबरोबरच इंजिन विकसनाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. संपूर्णतः देशी बनावटीचे मोटारीचे इंजिन बनविण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. २०२० च्या एप्रिल महिन्यापासून ‘बीएस-६’ हे निकष लागू होतील, ज्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- रश्‍मी उर्ध्वरेषे, संचालिका, एआरएआय

पुणे

पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी...

03.03 AM

पिंपरी  - लोकसभा निवडणुकीला सव्वावर्षांपेक्षा जास्त कालावधी असताना केवळ आपली धास्ती घेतल्यामुळे लक्ष्मण जगताप उसने...

02.42 AM

पुणे - शहर आणि परिसरात येत्या गुरुवारी (ता. 21) पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केली. शहरात...

02.03 AM