बारामतीत वाहनविक्रीचा उच्चांक

Vehicle
Vehicle

बारामती शहर - एकीकडे मंदीच्या सावटाची चर्चा सर्वत्र सुरू असताना दुसरीकडे वाहन व्यवसायात मात्र तेजी असल्याचे आकडे समोर आले आहेत. वाहनखरेदी करताना लोकांनी मंदीचा फार विचार केलेलाच नाही, असे आकडेवारीनंतर स्पष्ट होते. नुकत्यात संपलेल्या आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारची मिळून तब्बल ८६९१ अधिक वाहनांची नोंद झाली ही बाब बरेच काही सांगून जाणारी आहे. 

एकट्या बारामतीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गतवर्षीच्या तुलनेत कररूपाने १६ कोटी २० लाखांचे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त केले. सन २०१६-२०१७  आर्थिक वर्षात बारामतीच्या कार्यालयास ६७ कोटी १४ लाखांचा महसूल प्राप्त झाला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१७-२०१८ मध्ये हा आकडा तब्बल ८३ कोटी ३३ लाखांवर जाऊन पोचला आहे. 

वाहनांच्या नोंदणीत झालेली वाढ व विविध करांच्या माध्यमातून सरकारला अतिरिक्त महसूल मिळाला. यंदा विशेष म्हणजे २०१६-२०१७ मध्ये ८५० ट्रॅक्‍टर्सची नोंद झाली तोच आकडा यंदा जवळपास दुप्पट म्हणजे १६६१ इतका झालेला आहे. ट्रॅक्‍टर्सची संख्या दुपटीने वाढली याचा अर्थ कृषी क्षेत्राला गती आली, असे म्हणावे लागेल.

मंदीचे सावट गेले तरी कोठे...
बारामतीच्या आरटीओ कार्यालयातील वाहन नोंदणी आणि महसुलाची आकडेवारी पाहिल्यानंतर आर्थिक मंदी वाहन खरेदीबाबत गेली कोठे असा प्रश्‍न निर्माण होतो. नोटबंदी आणि जीएसटीचा फटका सर्वच क्षेत्रांना जोरदार बसला असे बोलले जात असले, तरी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढच दिसून येत आहे.

बारामती आरटीओला मिळालेला महसूल
2016-17    67 कोटी 14 लाख
2017-18    83 कोटी 33 लाख 
एकूण वाहनांची नोंदी
2016-17    23976
2017-18    32667
दुचाकी खरेदी
2016-17    17702
2017-18    24248
चारचाकी खरेदी
2016-17    3255
2017-18    3925

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com