पुणे - तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळकेंचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

तळेगाव स्टेशन (पुणे) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भाजपाचे सुनिल शंकरराव शेळके यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे आज (ता.25) दिला.

उपनगराध्यक्षपदाच्या वर्षभराच्या काारकिर्दीत पाणीपुरवठा विभिगाचा सभापती म्हणून मिळालेल्या संधीचे पुुुुर्णपणे चीज केले आहे.एक्सप्रेस फिडरसह पवना-इंद्रायणी पाणी योजनांचे नुतनीकरण करुन तळेगावकरांची पाणीटंचाई निर्मुलनाचा प्रयत्नाला सर्वतोपरी यश मिळाले.६४ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी योगदान देता आले याचे समाधान असल्याची भावना शेळके यांनी व्यक्त केली.आता पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पेलण्यास तयार असल्याचे शेळके यांनी सांगितले.

Web Title: vice president of talegao sunil shelke resigns