नदीपात्रातील रस्ता सुरु करा - मुळीक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

विश्रांतवाडी - खराडी ते शिवणे रस्त्याचे रखडलेले काम लवकर सुरू करण्याची मागणी पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आमदार जगदीश मुळीक यांनी केली. याबरोबरच नागरिकांच्या विविध समस्यांबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.

खराडी ते शिवणे नदीपात्रातील रस्त्याचे काम रखडलेले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास, येरवडा व पुणे-नगररस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागून वाहतुकीच्या कोंडीमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होणार असल्याचे मुळीक सांगितले. याबरोबरच या बैठकीत भामा आसखेड प्रकल्प व इतर समस्यांबाबत या विषयावरील चर्चा करण्यात आली. वडगावशेरी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या. या वेळी खराडी ते शिवणे नदीपात्रातील रखडलेल्या रस्त्याची लवकरच पाहणी करण्यात येणार असल्याचेही पुणे महापालिका आयुक्तांनी सांगितले. या बैठकीस नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका श्वेता गलांडे, अर्जुन जगताप, वृक्षसंवर्धन समिती सदस्य अरविंद गोरे, संतोष घोलप, महेश गलांडे स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: vishrantwadi pune news river road