पुण्यनगरीत "भाषा अनेक, देश एक'चा नारा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे -  फुलांच्या रांगोळीने सजलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आवार... औक्षण करून खास मराठमोळ्या पद्धतीने केलेले पंजाबी साहित्यिकांचे स्वागत... पंजाबी ढोलवादनावर भांगडाबरोबरच महाराष्ट्रातल्या फुगडीचा फेर... "भाषा अनेक, देश एक', "जो बोले सो निहाल, सत श्री अकाल'चा घुमणारा नारा... पंजाबी वेशातील तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांना मराठीजनांची मिळालेली साथ... अशा उत्साही वातावरणात पहिल्या पंजाबी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी निघाली. यात पंजाब आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचे एकत्र दर्शन पुणेकरांना पाहायला मिळाले. 

देशाच्या कानाकोपऱ्यात "भाषा अनेक, देश एक'चा संदेश देत निघालेल्या संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले. प्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेत दिंडीचे आणि पंजाबी साहित्यिकांचे स्वागत केले. त्यानंतर संमेलनस्थळाकडे (गणेश कला क्रीडा मंच) दिंडी मार्गस्थ झाली. यात मराठी-पंजाबी साहित्यिक, वाचक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "हम सब एक है' अशा घोषणा देत एकमेकांना जोडण्याचा संदेश या वेळी ग्रंथदिंडीतून देण्यात आला. 

"भारत जोडो'चा संदेश देणारे बाबा आमटे यांना ही ग्रंथदिंडी समर्पित करण्यात आली होती. त्यांचे पुत्र, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत केले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, संमेलनाध्यक्ष सुरजितसिंग पातर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, "पंजाबी साहित्य अकादमी'चे प्रमुख सुखदेवसिंग सिरसा, सचिव डॉ. सुरजित, "सरहद'चे संस्थापक संजय नहार, भारत देसडला, कवी जसवंतसिंग जफर, गुरुभेजसिंग गौर्य, "संवाद'चे सुनील महाजन उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ""पंजाब हे ह्रदय, तर महाराष्ट्र ही बुद्धी आहे. दोन्ही राज्यांत पूर्वीपासून जिव्हाळ्याचे नाते आहे. हे नाते अशा उपक्रमांतून अधिक घट्ट होत राहील.'' 

सबनीस-फुटाणे यांच्यात "युती' 

डॉ. श्रीपाल सबनीस आणि रामदास फुटाणे यांनी काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर जाहीर टीका केली होती. त्यानंतर दोघेही एकत्र आले नाहीत; पण पंजाबी संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्यात "युती' झाल्याचे पाहायला मिळाले. सबनीस यांनी संमेलनाच्या ग्रंथदिंडीत भांगडा नृत्यही केले. 

पुणे

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरायला सायबर कॅफेत रांग लागत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करायला...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

जुन्नर : शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना 'भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे कृषीनिष्ठ शेतकरी...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017