विवेक वळसे पाटील यांच्याकडून जनतेची दिशाभूल - आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पारगाव - ‘‘पुणे जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे राज्यात सर्वांत जास्त पदाचा गैरवापर करत जनतेची दिशाभूल करत आहेत,’’ अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

पारगाव - ‘‘पुणे जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे राज्यात सर्वांत जास्त पदाचा गैरवापर करत जनतेची दिशाभूल करत आहेत,’’ अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ॲड. अविनाश रहाणे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, देविदास दरेकर, सचिन बांगर, प्रवीण थोरात, तुकाराम काळे, प्रशांत दौलतराव हिंगे, मनीषा फल्ले, स्वप्नील हिंगे, गेणभाऊ हिंगे, सोमनाथ चव्हाण, सुमीत हिंगे आदी उपस्थित होते. 

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘विवेक वळसे पाटील आता माझ्यावर टीका करायला लागले आहेत की, मी दुसऱ्यांच्या कामांची उद्‌घाटने करतो. मी कधीही दुसऱ्यांच्या कामांची उद्‌घाटने केली नाहीत, उलट आम्ही मंजूर केलेल्या कामांची उद्‌घाटने राष्ट्रवादी काँग्रेसवाले करत आहेत. माझे नाव येऊ नये म्हणून यांनी आता घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. 

भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील म्हणतात, ‘निवडणुका आल्यामुळे मी दिसू लागलो आहे  मी लांडेवाडीतच राहत असून आपण कोठे राहता? जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे करणारा आणि मतदारसंघात जास्त वेळ देणारा मी खासदार आहे. काही जण आता लायकी नसतानाही माझ्यावर टीका करू लागले आहेत.’’ 

शिवसेना उपतालुका प्रमुख अजित चव्हाण व कल्याण हिंगे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद हिंगे यांनी आभार मानले.

माझ्या प्रत्येक निवडणुकीत अवसरी बुद्रुकने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवून ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात द्या, विकासकामांसाठी ५० लाख रुपयांचा निधी देतो. 
 - शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Web Title: vivek valse patil shivajirao adhalrao patil politics