वाबळेवाडीची शाळा 4 जून रोजी होणार सुरू

भरत पचंगे
बुधवार, 30 मे 2018

शिक्रापूर (पुणे): संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा 15 जुन रोजी सुरू होत असताना येथील वाबळेवाडी इंटरनॅशनल शाळा मात्र 4 जून रोजीच सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. शाळेसाठी सहा शिक्षकांची नव्याने उपलब्धतता शासनाने करुन दिल्याने आता शाळेत एकुण नऊ शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी दिली.

वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला यावर्षी इंटरनॅशनल ओजस शाळा म्हणून इयत्ता 8वी पर्यंत मान्यता देताना शासनाने शाळेत महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासक्रमाचा आग्रहक करुन त्याची तयारीही सुरू केली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत केवळ तीनच होते. मात्र, इयत्ता बारावीपर्यंत शाळेला मान्यता देताना शासनाने तीन शिक्षकांच्या मदतील चार उपशिक्षक तर दोन पद्वीधर शिक्षक उपलब्ध करुन दिले आहेत.

एकुण शिक्षक संचमान्यतेनुसार सुनिल पलांडे, संदीप गिते, जयश्री पलांडे, प्रतिभा पुंडे, शरीफा तांबोळी, दिलीप कुसाळे आदी सहा शिक्षक येथे नव्याने रुजू झाले असून, या सर्वांचे 21 दिवसांचे महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासक्रमाबाबतचे विशेष प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण संस्थेत सध्या मुंबईत सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक वारे यांनी दिली. हे प्रशिक्षण 2 जुन रोजी पूर्ण होणार असून इयत्ता पहिली ते आठवीचे शाळावर्ग 4 जून पासून सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, वाबळेवाडी ग्रामस्थ व पालकांनी एकत्रित घेतल्याची माहिती उपशिक्षक एकनाथ खैरे व सतीश वाबळे यांनी दिली.

Web Title: wablewadi zp school start on 4 june