वाघोली - नो हॉर्न डे निमित्त जनजागृती

wagholi
wagholi

वाघोली - वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या वतीने बुधवारी सायंकाळी "नो हॉर्न डे", बाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. वाघेश्वर मंदिर चौकात विविध फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली. 

आर.टी.ओ. पुणे व पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने 12 सप्टेंबर हा दिवस "नो हॉर्न डे" म्हणून साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या वतीने वाघेश्वर मंदिर चौकात हॉर्न वाजवू नये यासाठी जनजागृती करण्यात आली. एम एच 12, हॉर्न चे वाजवा 12, नो हॉर्न ओके प्लीज, नो मोर हॉर्न प्लीज अशा प्रकारचे संदेश असणारे फलक अससोसिएशन च्या सदस्यांनी हातात घेऊन जनजागृती केली. या वेळी आता हॉर्न वाजवणार नाही असा संकल्प करण्यात आला. या जनजागृती मोहिमेमध्ये लोणीकंद पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी, वॉर्डन सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com