जलसंधारणासाठी गावातील नागरिकांनी करा एकजूट

राजकुमार थोरात
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वालचंदनगर - भविष्यात पाण्याचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता असल्याने गावांनी नागरिकांनी एकजूट करुन जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग होण्याची गरज असल्याचे मत बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांना व्यक्त केले. थोरातवाडी (ता.इंदापूर) येथे पाणी फाउंडेशनच्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करीत होते.

यावेळी थोरातवाडीच्या सरपंच राणी थोरात, उपसरपंच शैलजा पवार, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, माजी सरपंच केशव नगरे, बाळासाहेब नगरे, अमोल तनपुरे, सुभाष थोरात, महेश पवार, अजिनाथ भोसले, बंडू पवार, अण्णा धालपे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी सांगितले की, जलसंधारणाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होवू शकते. मनुष्याकडे पैसा असले मात्र पाणी नसेल. माणसाला पाण्याचे नाटक करता येत नाही. समाजातील प्रत्येक नागरिकाने मान-पान बुरख्यातुन बाहेर येवून जलसंधारणाच्या कामाला सुरवात करावी. ८ एप्रिल पासुन पाणी फांउडेशनच्या माध्यमातुन श्रमदानास सुरवात होत आहे. गावातील नागरिकांनी एकजूट करुन श्रमदानामध्ये सहभागी व्हावे. अनेक गावामध्ये जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याअभावी गावे सोडून गेलेले शेतकरी गावामध्ये येवून नव्याने शेती करु लागले आहे. ज्या गावामध्ये उसाचे एक कांडे देखील नव्हते त्या गावामध्ये हजारो एकर उसाची लागवड होत असल्याचे सांगितले. यावेळी पाणी फाउंडेशनचे कृष्णांत शिंदे यांनी इंदापूर तालुक्यातील 

थोरातवाडी, उद्धट, पवारवाडी, मानकरवाडी, कळंब, लासुर्णे, सराफवाडी, कळंब, निमसाखर, निरवांगी, शिरसटवाडी, बेलवाडी गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले.

Web Title: walchandnager citizens of the village united for water conservation