प्रभाग कचरामुक्त करणार - भोसले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेच्या गेल्या म्हणजे, 2012 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर शहरात सर्वाधिक कामे माझ्या प्रभागात केली आहेत. त्यात, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयसमोरील उड्डाण पूल, क्रीडांगणे, महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि आरोग्य योजना राबविल्या आहेत. आता नव्या प्रभागातील महिलांच्या सुरक्षितता, त्यांच्या आरोग्याबरोबरच संपूर्ण प्रभागातील रस्ते कचरामुक्त करणार असल्याचे पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागातील भाजप पुरस्कृत उमेदवार रेश्‍मा भोसले यांनी शुक्रवारी सांगितले. मतदारांनी याच मुद्यांवर मते द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. 

प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असतानाच, भोसले यांनी प्रत्येक घरात जाऊन महिला आणि लहान मुलांची भेट घेतली. विशेष म्हणजे, ज्या ज्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल आहेत, अशांची ही त्यांनी आस्थेने चौकशी करीत, या पुढील काळात, प्रभागात सक्षम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे आश्‍वासन दिले. प्रभागातील विविध भागात मतदारांच्या गाठीभेटीदरम्यान, मतदारांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या वेळी विविध घटकांतील लोकांशी पाठिंबा देत, भोसले यांना निवडून आणण्याचा संकल्पही केला. त्यामुळे भोसले यांच्या प्रचारात शुक्रवारी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते. 

भोसले म्हणाले, ""लोकांच्या समस्या जाणून घेता, त्या कशा पद्धतीने सोडविता येतील, याचे नियोजन केले आहे. त्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. लोकांशी रोजचा संपर्क ठेवण्यासाठी त्या-त्या भागात परिणामकारक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जेणेकरून लोक केवळ दूरध्वनी किंवा, "एसएमएस'च्या माध्यमातून त्यांच्या समस्या कळू शकतील, त्यानंतर काही मिनिटांमध्येच त्या सोडूवू. महिलांची सुरक्षितता महत्त्वाची असून, त्यासाठी प्रभागातील सर्व पोलिस चौकी त्यांच्यांशी जोडण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी या निवडणुकीत मते द्यावीत.'' 

नागरिकांच्या सोयीसाठी...... 
कचरा, पाणी, रस्ते, या मूलभूत सुविधांकरिता स्वतंत्र समिती, 
प्रभागात विशेषत: गोखलेनगरसारख्या परिसरात भाजी मंडई, 
महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग भवन 
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा थांबे, स्कूलबस थांबे उभारणार, 
ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी "ट्रॅफिक फ्रेंड' नेमणार 

गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात 
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात विशेषत: शिवाजीनगर परिसरात पुण्याबाहेरील विद्यार्थी वास्तव्यास येतात. अशा गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी या परिसरात स्वतंत्र भवन उभे करण्यात येणार आहे. जेणे करून राज्याच्या विविध भागांतील गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळणार आहे. अल्पदरात त्यांचे राहणे आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही रेश्‍मा भोसले यांनी सांगितले. 

Web Title: Ward will be free of waste