भिडेंवर गुन्हा दाखल; पालखी मार्गात बेकायदा जमाव व घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकत्यांनी मिरवणुकीत विनापरवाना भाग घेतल्यामुळे पालखी मिरवणूक 10 ते 15 मिनिटे थांबून राहिली.

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयातील मार्गात गुडलक चौक ते संभाजी महाराज पुतळा यादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह संघटनेच्या काहीजणांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माऊलींचा पालखी सोहळा काल रविवारी सायंकाळी फगर्युसन रस्त्यावर आल्यानंतर शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकत्यांनी मिरवणुकीत विनापरवाना सहभाग घेतला. त्यामुळे पालखी मिरवणूक 10 ते 15 मिनिटे थांबून राहिली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली.