इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुलला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

आळंदी - ज्ञानोबा-माउलीचा अखंड जयघोष.. टाळमृदंगाचा गजर..अन्‌ भगव्या पताका उंचावत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेली. कार्तिकी एकादशीचा सोहळा अनुभवण्यासाठी दिंड्यांचा ओघ सुरू आहे. 

आळंदी - ज्ञानोबा-माउलीचा अखंड जयघोष.. टाळमृदंगाचा गजर..अन्‌ भगव्या पताका उंचावत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेली. कार्तिकी एकादशीचा सोहळा अनुभवण्यासाठी दिंड्यांचा ओघ सुरू आहे. 

शुक्रवारी कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या समाधीवर पहाटे अकरा ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने पवमान अभिषेक करण्यात येणार आहे. नोटाबंदीचा परिणाम वारीवर जाणवत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा वारकऱ्यांची संख्या दोन लाखांपर्यंत अंत्यल्प असल्याचे दिसून आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांची गर्दी आज इंद्रायणी तीरावर भल्या पहाटेपासूनच तीर्थस्नानासाठी जमली. इंद्रायणीला पाणी मुबलक होते. मात्र, सोबत असलेल्या जलपर्णीमुळे वारकऱ्यांना जलपर्णीचा उपद्रवही जाणवत होता. 

स्नानानंतर माउलींच्या समाधी दर्शनासाठीची रांग आज इंद्रायणी तीराच्या पलिकडे असणाऱ्या दर्शनबारीत पोचली. काल रात्रीपर्यंत मोकळी असलेली दर्शनबारी आज मात्र दिवसभर भक्तांनी फूलन गेली होती. याशिवाय रामवाड्याशेजारी नवीन दर्शन मंडपही भाविकांच्या गर्दीने भरून गेला होता. रांगेतील भाविकास समाधी दर्शनासाठी दोन ते अडीच तास उभे राहावे लागत आहे. ठिकठिकाणाहून आलेल्या दिंड्या चार दिवसांपासूनच आळंदीत विसावल्या आहेत. 

Web Title: Warkari in indrayani

टॅग्स