मीना नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Warning to the Meena River Edge Villages
Warning to the Meena River Edge Villages

जुन्नर : वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार (ता14) सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे आज रविवार (ता.15) सकाळ पासून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 
सध्या धरणाचे दरवाजे उघडे असून सांडव्यापर्यंत पाणी भरले आहे. ROS (reservoir operation schedule) प्रमाणे गेट एक ऑगस्ट रोजी टाकावायचे असल्याने सांडव्यावरून मीना नदीपत्रात पाणी सोडणे सुरू आहे. आजचा उपयुक्त साठा 577 दलघफु इतका आहे. सांडवा विसर्ग 2118 क्युसेक्स इतका आहे. धरणाचे दरवाजे एक ऑगस्ट रोजी बंद करण्यात येणार आहेत अशी माहिती शाखा अभियंता प्रकाश मांडे यांनी दिली.  

कुकडी प्रकल्पातर्गत जुन्नर तालुक्यात मीना नदीवर वडज धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. 1976 पासून या धरणाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली तर 1983 साली हे धरण पूर्णत्वास आले. या धरणाची पाणीसाठवन क्षमता 1.25 टीएमसी इतकी आहे. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी शनिवारी रात्री पासून ते रविवार सकाळपर्यंत झालेल्या जोरदार पावसाने वडज धरणात सहा टक्के पाणीसाठा वाढला आहे. धरणक्षेत्रात आजपर्यंत 203 मिमी इतका पाऊस झाला आहे. धरणात आजमितीस 577 दशलक्ष घनफुट (40.69 टक्के) ‎इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तर 2118 कुसेक्स इतक्या वेगाने सांडवा विसर्ग सुरू आहे. 

आदिवासी भागात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणाची पाणीपातळी वाढत आहे. नदी काठच्या गावांना धरण प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वडज, निमगाव तर्फे म्हाळुंगे, निमदरी, सावरगाव, वडगाव सहानी, बस्ती, पिंपळगाव, आर्वी, वरूळवाडी, गुंजाळवाडी, नारायणगाव, खोडद, वळती, रांजनी, नागपूर, मांजरवाडी या गावांच्या सरपंच व ग्रामसेवकाना संपर्क साधून सावधानता बाळगण्याचे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com