मोठ्या रकमा भरलेल्या बॅंकांवर करडी नजर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पिंपरी - नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा भरणा झालेल्या बॅंकांवर केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) करडी नजर आहे. त्यासंदर्भातील तक्रारी सीबीआयकडे आल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये पुणे परिसरातील तीन ते चार बॅंकांचा समावेश असल्याचे समजते. 

देशात नोटाबंदी झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत ग्राहकांनी बॅंकांमध्ये गर्दी केली होती. त्या वेळी अनेकांनी बॅंकांमध्ये रोख रकमेचा भरणा केला. त्या भरण्यावर केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ (सीबीडीटी) तसेच प्राप्तिकर विभागाची करडी नजर होती. या काळात मोठ्या रोख रकमेचा भरणा करणाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. सीबीआयकडेही या संदर्भातील तक्रारी आल्या आहेत. नोटाबंदीच्या काळात झालेल्या व्यवहारांची माहिती देणाऱ्या तक्रारी सीबीआयकडे आल्या आहेत. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन योग्य तो तपास सुरू आहे. 

माहिती कळविण्याचे आवाहन 
नोटाबंदीच्या काळात बॅंकांमध्ये झालेल्या मोठ्या रोख रकमेच्या भरण्यासंदर्भात काही माहिती असल्यास त्याची माहिती केंद्रीय सदन, सीबीआय कार्यालय, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड या पत्त्यावर कळविण्याचे आवाहन केले आहे. तक्रारीची छाननी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी कळविले आहे.

Web Title: watch on banks of large amounts