मद्यविक्री परवान्यांवर ‘वॉच’

मद्यविक्री परवान्यांवर ‘वॉच’

पुणे - राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या पाचशे मीटर परिसरात मद्यविक्रीला बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुणे व जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांना फटका बसणार आहे.

न्यायालयाच्या या निकालाचा आधार घेत सरकारने राज्यातील या सर्व मार्गांवरील मद्यविक्रीसाठी परवाना दिलेल्यांची माहिती मागविली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार राष्ट्रीय महामार्ग आणि सतरा राज्य मार्गांवरील मद्यविक्रेत्यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गाची यादी तयार केली आहे. याशिवाय या दोन्ही महामार्गांवर मद्यविक्रीसाठी लावलेले चिन्ह, बोर्ड आणि जाहिरातीचे फलक तातडीने काढण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. याचा फटका पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक नामवंत हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे. मात्र, पंचतारांकित हॉटेलचा समावेश आहे की नाही, याबाबत आदेशात स्पष्ट केले नाही. त्यामुळे त्या हॉटेलबाबत सरकारची भूमिका काय राहणार आहे, हे गुलदस्त्यातच आहे.

राज्य महामार्गावरील हॉटेल व महामार्ग क्रमांक...
मढ-जुन्नर-नारायणगाव - (क्र. १११)
वेल्हे-मंचर, घोडेगाव-भीमाशंकर - (क्र. ११२)
भीमाशंकर-राजगुरुनगर-मलठण-शिरूर - (क्र. १०३)
द्रुतगती मार्ग - वडगाव-चाकण-शिक्रापूर (तळेगाव-खालुर्बें मार्ग) -(क्र. ५५)
पुणे-संगम-औंध-पुनावळे-रावेत - (क्र. ११४)
एरंडवणे-वारजे-कुडजे-मांडवी-सांगरून-बहुली-पिरंगुट - (क्र. ११५)
कात्रज-पिसोळी- उंड्री-उरुळी देवाची- लोणीकंद - (क्र. ११९)
शिक्रापूर- लोणी-जेजुरी - (क्र. ११७)
शिरूर-पारगाव-चौफुला-सांगवी - (क्र. ११८)
भोर-कापूरहोळ-सासवड-यवत- पारगाव - (क्र. ११९)
पुणे-काळेवाडी-पवारवाडी- सासवड-जेजुरी-बारामती - (क्र. १२०)
पुणे- वडगाव बुद्रुक - खडकवासला-डोणजेफाटा- मावळ-रांजणे- वेल्हे - (क्र. १३३)
पुणे-भिवरी-बापेगाव- चांबळी- सासवड-खंडाळा - (क्र. १३१)
वडगाव शेरी-मुंढवा-हडपसर - (क्र. १३५)
सर्व्हे नंबर १२९ - लोहगाव- वाघोली-पारगाव - (क्र. ६८)
काद्रेनगर-दिघी- चोवीसवाडी-आळंदी-पारगाव - (क्र. १२९)
देहूरोड- गणेशखिंड - (क्र. १३०)

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व महामार्ग
पुणे-निगडी-देहूरोड- सोमाटणे- लोणावळा-मुंबई - (क्र. ४)
वडगाव, पश्‍चिम बाह्यवळणरस्ता-गणेशखिंड-कात्रज-सातारा - (क्र. ४)
पुणे-हडपसर-लोणी-यवत-चौफुला-भिगवण-सोलापूर - (क्र. ९)
पुणे-वडकी-भोसरी-चाकण-मंचर-संगमनेर-नाशिक - (क्र. ५०)

प्रमुख राज्य महामार्ग...
मुरूड-रोहा-पौड-पुणे-कळस-लोणीकंद-शिक्रापूर-नगर - (क्र. ५)
मंडणगड-महाड-भोर-शिरवळ-पंढरपूर - (क्र. १५)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com