नाणेघाट (ता. जुन्नर) - परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. डवऱ्यातून पाणी जमा करण्यात गुंतलेले कुटुंब.
नाणेघाट (ता. जुन्नर) - परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. डवऱ्यातून पाणी जमा करण्यात गुंतलेले कुटुंब.

नाणेघाट परिसरात पाण्यासाठी दाही दिशा

जुन्नर - जुन्नरजवळील ऐतिहासिक नाणेघाट परिसरातील सुमारे एक हजार लोकवस्तीला पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. घाटघर गावासह लव्हाळे वस्ती, नाणेघाट वस्ती, अडुळशी येथे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. फडके तलाव परिसरात ओढ्याच्या पात्रात खड्डे (डवरे) घेऊन वाटी वाटीने पाणी भरण्याची वेळ आली आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा वेळ खर्च होत आहे. सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणावे लागत आहे. घाटघरच्या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती केली. नळ कोंढाळी केली, आज-उद्या पाणी येईल, अशी घोषणा झाली, पण पाणी काही आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. येथील विंधन विहिरीचा हातपंप नादुरुस्त झाल्याने टंचाईत भर पडली आहे. नागरिकांची टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी असली तरी प्रस्ताव न केल्याने टॅंकर कधी मिळणार हा ही प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com