टाक्‍यांच्या कामांची स्थगिती उठणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदाप्रक्रियेबाबत अहवाल दिल्यानंतरही राज्य सरकारकडून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही; परंतु टाक्‍यांच्या कामांची स्थगिती उठविण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यात आठवडाभरात बैठक होईल. त्यानंतर स्थगितीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

शहरात राबविण्यात येणाऱ्या चोवीस तास समान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेंतर्गंत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदाप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपामुळे या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात सविस्तर अहवाल पाठविण्याचा आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आला होता. त्यानुसार अहवाल पाठविण्यात आला. अहवाल मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आता सहा दिवस झाले तरी निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावर विरोधी पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. 

पाण्याच्या टाक्‍यांची कामे वेगाने व्हावीत, यासाठी प्रशासनही प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून, राज्य सरकारबरोबर चर्चा सुरू केली आहे. निविदाप्रक्रियेबाबतच्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून, या संदर्भात आयुक्त कुणाल कुमार नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. 

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांची कामे झाली पाहिजेत. निविदाप्रक्रियेबाबतच्या अहवालावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे ही कामे लवकर सुरू होतील.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

Web Title: water tank working