जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागात पाण्याचा टँकर सुरू

water-tanker
water-tanker

जुन्नर - जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण चिंताजनक असून, या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जुन्नर तालुका रहिवासी संघ, पिंपरी चिंचवड, पुणे व अतुल बेनके युवा मंच जुन्नर यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी येथे केले.

आदिवासी भागातील पाणीटंचाईच्या समस्या भेडसावणाऱ्या वाड्या वस्त्यांना जुन्नर तालुका रहिवासी संघ पुणे, पिंपरी चिंचवड ,पुणे व अतुल बेनके युवा मंच जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी बेनके बोलत होते. तहसिलदार किरण काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष धनराज खोत, उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊ देवाडे, नगरसेवक दिनेश दुबे, अजिंक्य घोलप, बाळा सदाकाळ, फिरोज पठाण तसेच युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

बेनके म्हणाले की, पश्चिम आदिवासी भागात सर्वाधिक पाऊस होऊनही ऐन उन्हाळ्यात काही ठिकाणी तीव्र पाणीटंचाई मुळे नागरिकांचे हाल होतात. सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविला आहे. यापूर्व काळात पूर्व भागात जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाल्यानंतर मंचच्या वतीने मोफत चारा वाटप करण्यात आला होता.  तसेच ज्या गावी,वाडी-वस्तीवर पाण्याची तीव्र टंचाई आहे त्या भागातील नागरिकांनी टँकर उपलब्ध होण्यासाठी मागणी करावी असे आवाहन अतुल बेनके यांनी यावेळी केले. तहसीलदार किरण काकडे म्हणाले की, प्रशासनाच्या वतीने टंचाई सदृश्य गावांना टँकर उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. तालुक्यात नळावणे, कोपरे व जळवंडी या ठिकाणी तीन टँकर व एक ट्रॅक्टर द्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com