पाणी चोरल्याप्रकरणी 10 शेतकऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

वालचंदनगर - रुई (ता. इंदापूर) येथील नव्या मुठा उजव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्या; तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणाऱ्या दहा शेतकऱ्यांवर वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विष्णू आत्माराम मारकड, बापू महादेव मारकड, सोपान राजाराम मारकड, उदय आत्माराम पाटील, भाऊ दिनकर मारकड आदींचा त्यात समावेश आहे. लोणी देवकर पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी नाथसाहेब गोविंद चव्हाण यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मुठा उजव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे. रविवारी (ता. ८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परिसरातील सुमारे दहा शेतकऱ्यांनी मोरीला खालच्या बाजूला होल पाडून पाणीचोरी केली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणी चोरी करू नये, असे सांगितले असता त्यांनी अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली. याप्रकरणी पाणी चोरल्याचा; तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस हवालदार सुरेंद्र वाघ यांनी दिली.

Web Title: water theft farmer crime