फुरसुंगीत वाया जाते पाणी

ढमाळवाडी (फुरसुंगी) - टाक्‍यांअभावी थेट टॅंकरमधूनच पाणी दिले जाते.  मात्र ते मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.
ढमाळवाडी (फुरसुंगी) - टाक्‍यांअभावी थेट टॅंकरमधूनच पाणी दिले जाते. मात्र ते मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.

फुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने पाणीटंचाईतही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

कचरा डेपोग्रस्त ढमाळवाडीला अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेच्या वतीने पाण्याचे टॅंकर पुरवले जात आहेत. चौकाचौकांत लोकांच्या दारासमोरच ठेवलेल्या एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्‍यांत पाणी साठवले जाते व तेथून नागरिक पाणी वाहून नेतात, मात्र अनेक ठिकाणी टाक्‍याच न ठेवल्याने टॅंकर आला, की थेट टॅंकरच्या पाइपमधूनच हंडे, बादल्या भरल्या जातात. यात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर सांडून वाया जाते.

उन्हाळ्यात येथे तीव्र पाणीटंचाई असताना व नागरिकांना दहा, बारा दिवसांनी एकदाच पाणी मिळत असताना, अशा पद्धतीने केवळ टाक्‍यांअभावी शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. मातीच्या रस्त्यावर हे पाणी लांबपर्यंत वाहत जाऊन रस्ता निसरडा, चिखलमय होऊन त्यावरून दुचाकी घसरून अपघातही होत आहेत. त्यामुळे येथे पालिकेने पुरेशा प्रमाणात पाणी साठवण टाक्‍या द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
मुंढवा - केशवनगरला नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांचेदेखील पाणी बंद करू, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.  पुणे महापालिकेत केशवनगरसह अन्य गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना सर्व नागरी सुविधा पुरविण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मुंबई ऊच्च न्यायालयात सादर केले होते; परंतु त्यानंतर काही महिने उलटले, तरी महापालिकेकडून या गावांत पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना मंत्रालयात नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार बच्चू कडू, विठ्ठल पवार, नंदा जाधव, लता गायकवाड, गौरव जाधव, अभय पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com