β हातातील भगवाच आता उत्तर देईल

संभाजी पाटील
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

लाखोंची संख्या, तरुण-तरुणींचा अभूतपूर्व सहभाग, लक्ष्मी रस्त्याकडे संथपणे वाहणारे भगवे रस्ते, असे दृश्‍य काल सकाळी आठ वाजल्यापासून पुण्याच्या मध्यवस्तीत दिसत होते. लाखोंची संख्या असतानाही अत्यंत शिस्तीत आणि आपल्या मागण्यांकडे ठामपणे लक्ष वेधत मराठा क्रांती मूक मोर्चा विधान भवनाकडे सरकला. उच्चांकी गर्दीसोबतच तरुणाईचा सहभाग हेही या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. 

लाखोंची संख्या, तरुण-तरुणींचा अभूतपूर्व सहभाग, लक्ष्मी रस्त्याकडे संथपणे वाहणारे भगवे रस्ते, असे दृश्‍य काल सकाळी आठ वाजल्यापासून पुण्याच्या मध्यवस्तीत दिसत होते. लाखोंची संख्या असतानाही अत्यंत शिस्तीत आणि आपल्या मागण्यांकडे ठामपणे लक्ष वेधत मराठा क्रांती मूक मोर्चा विधान भवनाकडे सरकला. उच्चांकी गर्दीसोबतच तरुणाईचा सहभाग हेही या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. 

सकाळी सहा वाजल्यापासून शहरात येणाऱ्या सातारा, नगर, मुंबई, सोलापूर अशा सर्वच रस्त्यांवरून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव पुण्यात दाखल झाले. यात बहुसंख्येने तरुण आणि तरुणींचा सहभाग होता. साधारणपणे 18 ते 20 या वयोगटातील तरुण हातात भगवा आणि आपल्या मागण्याचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. त्यांना दिलेल्या सूचनांचे ते तंतोतंत पालन करून ही तरुणाई अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाच्या दिशेने डेक्कनकडे मार्गस्थ होत होती. 

'आम्ही आमच्या भविष्यासाठी मोर्चात सहभागी झालो. केवळ जातीसाठी नाही तर न्यायहक्कासाठी मोर्चात सहभागी व्हायचे, असे मी ठरवले होते,‘‘ असे जुन्नर तालुक्‍यातून आलेल्या सुनीता जाधव हिने 'सकाळ‘शी बोलताना सांगितले. बारामतीच्या प्रसन्न जगतापने हा मोर्चा कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून निघाला नाही. मराठा समाजाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. आता जरी हे नेते मोर्चात सहभागी होत असले तरी समाजासाठी ते काय करतात, हे आम्हाला कळाले आहे. त्यामुळे आता आम्हीच आमच्या हातात भगवा घेतला असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. 

भोर तालुक्‍यातून आलेली हर्षदा पाटील म्हणाली, 'या मोर्चाने काय होणार, असा प्रश्‍न काहीजण मुद्दामपणे विचारतात. पण हा मोर्चा हा तरुणांचा आवाज आहे, हा आवाज आता कोणालाही आमच्यावर अन्याय करू देणार नाही. आमच्या मागण्या रास्त आहेत. त्याची खिल्ली उडवू नका.‘‘ 

तरुणाईला काहीतरी सांगायचे आहे, हे मोर्चातून पदोपदी जाणवत राहिले. मोर्चात विस्कळितपणा येऊ नये, यासाठी 'मराठा स्वयंसेवक‘ म्हणून तरुण-तरुणी चौकाचौकांत मोठ्या संख्येने सर्वांना मदत करत होता. एकूणच तरुणाई, तरुणाईचा आक्रोश, जोश आणि उमदेपणाचे दर्शन हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. 

पुणे

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे...

04.27 PM

पुणे : चांदणी चौकाकडून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तीव्र उतारावरच डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यामध्ये दोन ...

01.57 PM

पुणे - केंद्र सरकारच्या ‘यूआयडीएआय’ या संकेतस्थळालाच एरर येत असल्याने शहरातील ९३ पैकी केवळ चारच केंद्रांवर आधार नोंदणी व...

06.00 AM