रुळावरून रेल्वे घसरते तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंढवा - घोरपडी यार्डात प्रवासी रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरतो...यामुळे प्रवाशांत गोंधळ उडतो... पळापळ सुरू होते. या घटनेची सूचना मिळताच पुणे विभाग रेल्वे प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, आपत्कालीन पथक व रेल्वे पोलिस यार्डाकडे धाव घेतात. तातडीने मदतकार्य सुरू होते. अपघातातील जखमींवर उपचार सुरू होतात...एव्हाना बघ्यांनीही गर्दी केलेली. मात्र, शेवटी हा रेल्वेच्या ‘मॉक ड्रिल’चा भाग असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

रेल्वे प्रवासी गाडी सकाळी साडेदहाच्या सुमारास रुळावरून घसरली तर अशा प्रसंगी अचानक कोणतीही घटना, दुर्घटना घडू शकते. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची सज्जता तपासण्याच्या हेतूने शुक्रवारी घोरपडी यार्डात मंडल रेल प्रबंधकांच्या नेतृत्वाखाली ‘मॉक ड्रिल’चे आयोजन करण्यात आले. 
सकाळी साडेदहाच्या सुमारास यार्डामधील सुमारे दीडशे कर्मचारी रेल्वेच्या एका डब्यात बसले. अचानक हा डबा रुळावरून घसरला. त्यामुळे प्रवासी घाबरले.

काही जण जखमी अवस्थेत धावत होते. ही घटना खरी असल्याचे समजून खऱ्या प्रवाशांत गोंधळ उडाला. त्यांची पळापळ सुरू झाली. रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देत मुख्यालयातून अतिरिक्‍त पोलिस कुमक, हॉस्पिटल कर्मचारी व डॉक्‍टर, शिवाजीनगर येथील श्‍वानपथक मागवले. विक्रमी वेळेत ही तुकडी दाखल झाली. जखमींवर डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. घातपाताच्या शक्‍यतेची पडताळणी श्‍वानपथक करू लागले. काही अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना धीर देत होते. साडेबारा वाजता परिस्थिती नियंत्रणात येताच हे ‘मॉक ड्रिल’ असल्याचे जाहीर करण्यात आले.

Web Title: When the train derailed decline ...