सायकल ट्रॅक कोणासाठी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

हडपसर - हडपसर-स्वारगेट बीआरटी मार्गावर महापालिकेतर्फे सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र सायकलींसाठी हक्काच्या असलेल्या या मार्गावरून इतर वाहने धावत असून, या मार्गावर अतिक्रमणेही झाली आहेत. यामुळे का मार्ग नेमका कोणासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सायकलस्वारांचा प्रवास सुरक्षित व्हावा, सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे आणि इंधनाची बचत व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश होता; परंतु प्रत्यक्षात या मार्गावर सायकलस्वारांना जागोजागी विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. 

काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे म्हणून सायकल मार्ग बेपत्ता झाला आहे. तसेच काही अंतरानंतर तो पुन्हा सुरू झाला आहे. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण न झाल्याने या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे सायकलस्वार या मार्गाचा वापर करताना दिसत नाहीत. ते रस्त्याच्या कडेने जीव मुठीत धरून मार्गक्रमण करीत असतात. दोन ते अडीच मीटर रुंद असलेल्या या ट्रॅकचा वापर पार्किंगसाठी आणि अनधिकृत पथारीवालीवाल्यांसाठी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हा मार्ग पार्किंग, राडारोडा व कचऱ्याने व्यापलेला दिसत आहे. 

नागरिकांकडून जास्तीत जास्त सायकलचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेने हा प्रकल्प राबविला; परंतु त्याकडे प्रशासनाचे सध्या दुर्लक्ष होत आहे. शहरातील इतर सायकल मार्गावरही अतिक्रमणे झाली आहेत. हा मार्ग वापरण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती होणे आवश्‍यक आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. सायकल मार्गावरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. 

सायकल ट्रॅकचा वापर हा तर येथील वाहन पार्किंग, फळविक्रेते आणि पथारी व्यावसायिकांसाठीच होताना दिसत आहे, त्यामुळे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच जावे लागते. 
- राजू स्वामी, नागरिक  

Web Title: For whom the cycle track?