पत्नीवर ब्लेडने वार; एकाला पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या गालावर ब्लेडने वार केल्याच्या आरोपाखाली बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याची न्यायालयाने 5 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

नितीन पोपट दिवटे (वय 25, रा. राजीव गांधीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध त्याची पत्नी राणी दिवटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपी चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होता. 

सोमवारी सकाळी याच कारणावरून त्याने पत्नीच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले. पोलिसांनी आरोपीला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. 

Web Title: Wife blows