भाजपच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणण्यासाठी कटिबध्द : गावडे

संतोष आटोळे
बुधवार, 11 एप्रिल 2018

सावळ ग्रामपंचायती अंर्तगत येणाऱ्या सुमारे तीनशेच्या आसपास लोकवस्ती असलेल्या कुरणवस्ती येथील ग्रामस्थांना रस्ता दुरावस्थेमुळे अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषता पावसाळ्यात या भागातील ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत असे.

शिर्सुफळ : राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. बारामती तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भाग विकासांपासून वंचित आहेत. त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणण्यासाठी नेहमी कटीबध्द राहणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरुन गावपुढाऱ्यांनी विकासकामे अधिक दर्जेदार करण्याकडे लक्ष द्यावे गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही त़़डजोड स्वीकारु नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी केले.

सावळ (ता.बारामती) येथून कुरणवस्तीकडे जाणाऱ्या व गेल्या अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा प्रारंभ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी गावडे बोलत होते.

सावळ ग्रामपंचायती अंर्तगत येणाऱ्या सुमारे तीनशेच्या आसपास लोकवस्ती असलेल्या कुरणवस्ती येथील ग्रामस्थांना रस्ता दुरावस्थेमुळे अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषता पावसाळ्यात या भागातील ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत असे. यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास कार्यक्रमांर्तगत सुमारे 35 लाख रुपये खर्चाच्या रस्ता डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर करण्यात आला.

याकामाचा शुभारंभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुलाबराव गावडे, संजय तावरे, सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रविण आटोळे, ग्रामपंचायत सदस्या संगिता अनिल आवाळे, माजी सरपंच बाळासाहेब आटोळे, अंकुश आवाळे, मारुती आटोळे, प्रमोद आवाळे, अशोक आटोळे, शिवाजी आवाळे, नाना आवाळे, देवराज विरकर, नामदेव  भिसे, शरद बालगुडे,  सागर आटोळे, ठेकेदार माऊली भोसले, बारामती पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.ए.कोकणे, शाखा अभियंता बी.ए.कांबळे, ग्रामसेवक रावबा गवंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: will raise fund from BJP says Gawade