चुकीचे प्रकल्प रद्द करणार : बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

पुणे - ‘‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मंगळवार पेठेतील बोगस प्रकल्पासारख्या घटनांचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. ज्यांनी हा प्रकार केला आहे, ते संपूर्ण प्रकरण रद्द करू. ‘एसआरए’मध्ये चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही’’, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पर्वती येथील लडकतवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बापट यांच्या हस्ते पार पडला. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक अशोक येनपुरे, विनायक हनमघर, ‘आसरा’चे अध्यक्ष सुशील पाटील, विकसक दिलीप निकम, सूर्यकांत निकम, महेश लडकत आदी उपस्थित होते.

‘एसआरए’च्या मंगळवार पेठेतील बोगस प्रकल्पाचे वृत्त शनिवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. याविषयी बापट म्हणाले, ‘‘एसआरएचे चांगले प्रकल्पही पुढे येणे आवश्‍यक आहे. खराब काम करणाऱ्यांचे प्रकल्प रद्द करून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गरिबांसाठी चांगली घरे निर्माण झाली पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न असेल. ‘एसआरए’चे चांगले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही सहकार्य करण्याची गरज आहे.’’ विकसक निकम यांनी आत्तापर्यंत निर्माण केलेल्या प्रकल्पांचे बापट यांनी कौतुक केले. विशेषतः या प्रकल्पामध्ये सर्व झोपडीधारक लाभार्थी ठरले, हे वैशिष्ट्य असल्याचेही बापट यांनी सांगितले.

मिसाळ म्हणाल्या, ‘‘एसआरए स्थापन होऊन अनेक वर्षे झाली; मात्र त्याला पुरेशा प्रमाणात यश मिळाले नाही. याउलट ‘एसआरए’विषयीच्या तक्रारी वाढत आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन चांगले प्रकल्प कसे होतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या प्रकल्पांमध्ये सोलर पॅनल, खतनिर्मिती प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे वैविध्यपूर्ण उपक्रम कसे राबविता येतील, याचाही विकसक व रहिवाशांनी विचार करणे आवश्‍यक आहे.’’ निकम यांनी प्रास्ताविक केले. भुरुक यांनी सूत्रसंचालन केले.

काळ्या यादीत विकसक
‘एसआरए’ प्रशासनाकडे बोगस प्रकल्प सादर करून सनराइज बिल्डर्सने प्रशासन व राज्य सरकारची फसवणूक केली आहे. विकसकाची नोंदणी रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचे काम ‘एसआरए’ने केले आहे. सरकारची फसवणूक केल्याबद्दल संबंधित विकसकावर फौजदारी गुन्हा दाखल करणार का, या प्रश्‍नावर ‘या फसवणुकीविषयी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो का, हे तपासून घ्यावे लागेल’ असे उत्तर ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लहुराज माळी यांच्याकडून मिळाले.

पुणे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली...

08.48 AM