वादळी पावसाने हाहाकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

बारामती/डोर्लेवाडी - बारामती, इंदापूर तालुक्‍यास रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. यात घाडगेवाडी (ता. बारामती) येथे जोराच्या वाऱ्यामुळे तोल जाऊन टेरेसवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोन्ही तालुक्‍यांतील पाच जण जखमी झाले आहेत. केळी, डाळिंब व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली, शेकडो झाडे उन्मळून पडली. 

आनंद व्यंकट साबळे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे; तर पिंपळी येथे तिघे व खांडज येथे एक वृद्ध, तर इंदापूर शहरात एक मुलगा असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

रविवारचा वादळी पाऊस नुकसानाचाच नव्हे; तर जीवघेणाही ठरला. घाडगेवाडी येथे आनंद साबळे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, दुसरा मजला सुरू असलेल्या गच्चीवर ते उभे होते. रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या वेगाने तोल जाऊन ते खाली पडले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. खांडज येथे महादेव कांबळे हे ज्येष्ठ नागरिक वीट लागल्याने जखमी झाले, तर पिंपळी येथे संतोष खंडागळे, रतन खंडागळे व सुनील लोंढे हे तिघे वादळात उडालेले पत्रे लागून जखमी झाले. जखमींना बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सायंकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तिघांचीही दवाखान्यात जाऊन विचारपूस केली. या वेळी छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण यांच्यासह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

येत्या दोन दिवसांत पंचनामे  
बारामती ः बारामती, इंदापूर तालुक्यात रविवारच्या पावसाने दाणादाण उडाली असून नुकसानाचे पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करावेत, असा आदेश प्रातांधिकारी हेमंत निकम यांनी सोमवारी दिला. 

बारामती तालुक्‍यातील पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, काटेवाडी, सावळ, खांडज, सांगवी आदी गावांसह इंदापूर तालुक्यास रविवारी रात्री झालेला वादळी पाऊस नुकसानकारक ठरला. दरम्यान या नुकसानाची प्राथमिक माहिती मिळाली असून झालेल्या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करावेत, असा आदेश प्रातांधिकारी निकम यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे. येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण करताना प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Windy rain in baramati